Indian Railway News: १ ऑक्टोबरपासून रेल्वेची विशेष तपासणी मोहिम, रेल्वे तिकीटासोबत ही कागदपत्रे जवळ बाळगा

IRCTC new rules: 1 ऑक्टोबरपासून रेल्वेने विशेष तिकीट तपासणी सुरु करण्याचा निर्णय घेताल आहे. सवलतीची तिकीटे आणि आरक्षण कोट्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची खास तपासणी केली जाणार आहे.

Indian Railway News: १ ऑक्टोबरपासून रेल्वेची विशेष तपासणी मोहिम, रेल्वे तिकीटासोबत ही कागदपत्रे जवळ बाळगा
indian railway
| Updated on: Sep 30, 2026 | 4:31 PM

IRCTC new rules 1st October: भारतीय रेल्वे एक ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विशेष तिकीट तपासणी मोहिम राबवणार आहे. या दरम्यान तिकीटाची वैधता आणि त्याची सत्यता तपासणीवर भर देण्यात येणार आहे. सवलतीचे तिकीट, ठरलेला आरक्षण कोटा आणि रेल्वे पासद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विशेष तपासणी केली जाणार आहे. रेल्वेच्या मतानुसार ही मोहिम सणासुदीच्या मोसमाच्या आधी चालवणे जाणार आहे. या काळात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.ही मोहिम मध्य रेल्वेच्या वतीने चालविण्यात येणार आहे.

एकाच तिकीटावर जादा प्रवास करणाऱ्यांनो लक्ष द्या

सवलत किंवा ठराविक आरक्षण कोट्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपली वैधता सिद्ध करण्यासाठी आवश्यक ओळखपत्राची सत्य प्रत सोबत ठेवावी असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्निल निला यांनी म्हटले आहे. जर एका पीएनआरवर अनेक प्रवाशांचे तिकीट बुक आहे. तर त्या तिकीटावर नोंदवलेल्या किमान एका प्रवाशाकडे ओळखपत्राची सत्य प्रत असणे गरजेचे आहे. जर आवश्यक ओरिजनल ओळखपत्राची सत्य प्रत मिळाली नाही नियमांनुसार त्या तिकीटावर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी मानले जाईल असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

Loading...

सवलत -कोटावाल्या तिकीटाची विशेष तपासणी

रेल्वेचे तिकीट चेकिंग कर्मचारी सवलत आणि ठरलेल्या आरक्षण कोट्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आवश्यक ओरिजनल कागदपत्रांची तपासणी करतील. E-Pass वा PTO ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील आवश्यक ओळखपत्र सोबत राखावे लागेल. तसेच प्रवास सुरु होण्याच्या आधी हे निश्चित करावे लागेल की E-Pass/PTO ना प्रवास करण्यासाठी निर्धारित प्राधिकरणात विधिवत बदल करण्यात आला आहे.

अनारक्षित तिकीटांची होणार तपासणी

विशेष मोहिमेंतर्गत अनारक्षित ट्रेन तिकीटांच्या वैधतेची तपासणी करण्यावर देखील खास लक्ष देण्यात आले आहे. गरज पडल्यास तिकीट चेकींग कर्मचारी तिकीटांची वैधता तपासण्यासाठी
TTE App चा वापर देखील करु शकतात.

रेल्वेचे विशेष अभियान का ?

सेंट्रल रेल्वेच्या या तपासणी मोहिमेचे प्रमुख उद्देश्य :

आरक्षण सुविधाचा चुकींचा वापर रोखणे

रियायत आणि रेल्वे पासचा चुकीचा वापर रोखणे

तिकीटांच्या सत्यतेची तपासणी करणे

रेल्वेच्या राजस्वचे नुकसान रोखणे

भारतीय रेल्वेच्या अनुसार ट्रेन प्रवासासाठी दस्तावेज मान्य

निवडणूक आयोगाने जारी केलेले मतदान ओळख पत्र

पासपोर्ट

आयकर विभाग द्वारा जारी PAN कार्ड

RTO द्वारा जारी ड्रायव्हींग लायसन्स

केंद्र वा राज्य सरकारद्वारा जारी सीरियल नंबरवाले फोटो ओळखपत्र

मान्यता प्राप्त शाळा वा कॉलेजद्वारा विद्यार्थ्यांना जारी फोटोवाले स्टूडन्ट ID कार्ड

फोटोवाले राष्ट्रीयकृत बँकचे पासबुक

बँकद्वारे जारी लॅमिनेटेड फोटोवाले क्रेडिट कार्ड

आधार कार्ड

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us