जत्रेत चेंगराचेंगरी, 3 महिलांचा गुदमरुन मृत्यू! राजस्थानातील मंदिराचे दरवाजे उघडताच झालेल्या चेंगराचेंगरीने खळबळ

Rajasthan stampede : मृत्यू झालेल्या तिघा महिला भाविकांच्या कुटुबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जत्रेत चेंगराचेंगरी, 3 महिलांचा गुदमरुन मृत्यू! राजस्थानातील मंदिराचे दरवाजे उघडताच झालेल्या चेंगराचेंगरीने खळबळ
राजस्थानात चेंगराचेंगरीImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 9:25 AM

राजस्थानात (Rajasthan Stampede) चेंगराचेंगरी दरम्यान, तीन महिलांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. एका जत्रेदरम्यान, ही दुर्घटना घडली. तर कित्येक जण जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केला जाते आहे. राजस्थानच्या सीकर येथे असलेल्या खाटूश्यामजी मंदिरात (Khatu Shyamji Temple) दर महिन्याला जत्रा भरते. या मासिक जत्रेसाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीदरम्यान गोंधळ उडाला आणि चेंगराजेंगरी होऊन तीन महिलांचा गुदमरुन जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान, ही दुःखद घटना घडली. श्रावणी सोमवार असल्याने अनेक भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले होते. त्यावेळी ही घटना घडली. पहाटे पाच वाजता जेव्हा मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी उघडण्यात आले तेव्हा भाविकांनी एकच गोंधळ गेला. गर्दी असल्यानं गोंधळ वाढला, चेंगराचेंगरा (Stampede News) झाली आणि तीन जणींना जागीच प्राण गमवावा लागला.

या दुर्घनटेत जीव गमावलेल्या महिलांपैकी एक महिला ही हिसारची असल्याची माहिती समोर आली आहे. तर अन्य दोन महिलांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी जयपूरला पाठवण्यात आलंय. तर एकावर खाटू श्यामजी स्थानिक रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. आता पोलिसांकडून या चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी चौकशी केली जातेय.

मृत्यू झालेल्या तिघा महिला भाविकांच्या कुटुबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. श्रावणी सोमवार निमित्त अनेक मंदिरात भाविकांची गर्दी होत असते. त्या पार्श्वभूमीवर आधीपासूनच तयारीही मंदिर प्रशासनाकडून केली जाते. मात्र खाटू श्यामजी मंदिरात घडलेल्या दुर्घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जातेय.

दरम्यान, या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. तसंच जखमी भाविक लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थनाही केली आहे. तसंच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून सर्व प्रशासकीय यंत्रणांना मदतीचे निर्देशही जारी केलेत.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.