Election Commissioner | निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी राजीव कुमार यांची नियुक्ती

निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती झाली आहे (Rajiv Kumar appointed as the Election Commissioner).

Election Commissioner | निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी राजीव कुमार यांची नियुक्ती

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती झाली आहे (Rajiv Kumar appointed as the Election Commissioner). ते 1 सप्टेंबरपासून आपला कार्यभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्थ सचिव राहिलेल्या राजीव कुमार यांची भारतीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली.

राजीव कुमार हे 1984 च्या बॅचचे झारखंड केडरचे अधिकारी आहेत. ते अशोक लवासा यांच्या जागेवर पदभार स्वीकारतील. लवासा यांनी फिलिपीन्समधील एशियन डेव्हलपमेंट बँकेचं उपाध्यपद स्वीकारण्यासाठी निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा दिल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींना दिलेल्या क्लीन चीट प्रकरणी अशोक लवासा नाराज होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चीट देताना आपलं मत विचारात न घेतल्याने लवासा यांनी बैठकीला न जाणं पसंत केल्याचं सांगण्यात येत होतं. लवासा म्हणाले होते, “बैठकीला जाण्यात काहीही अर्थ नाही. त्यादरम्यान मी दुसऱ्या कामात तरी लक्ष देऊ शकेन.”


निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींना क्लीन चीट देताना आपलं मत विचारात घेतलं नसल्याचा आरोप अशोक लवासा यांनी केला होता.  निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींना 8 प्रकरणात क्लीन चीट दिली आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) 3 सदस्यीय समितीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्यासह अशोक लवासा आणि सुशील चंद्रा या दोन निवडणूक आयुक्तांचा समावेश होता. आता अशोक लवासा यांच्या जागी राजीव कुमार यांची नियुक्ती झाली आहे.

संबंधित बातम्या :

मोदींच्या क्लीन चीटवरुनही मतभेद, निवडणूक आयुक्त अशोक लवासा नाराज

यु. पी. एस मदान महाराष्ट्रचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

जवानांच्या नावे मतं मागितल्याप्रकरणी मोदींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

Rajiv Kumar appointed as the Election Commissioner

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *