AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

High Court : लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवून, नंतर कुंडली जुळण्यावरुन…उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

High Court : आपल्या लग्नात कुठलाही अडथळा येणार नाही असं आरोपीने पीडित महिलेला वारंवार आश्वासन दिल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आलं. यात कुंडली जुळवण्याचा मुद्दा सुद्धा होता.

High Court : लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवून, नंतर कुंडली जुळण्यावरुन...उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
Marriage
| Updated on: Feb 24, 2026 | 12:09 PM
Share

दिल्ली उच्च न्यायालयाने एका सुनावणी दरम्यान महत्वाची टिप्पणी केली आहे. एखाद्या व्यक्ती लग्नाचं आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवत असेल आणि नंतर कुंडली जुळत नाहीय सांगून मागे फिरला, तर त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 69 अंतर्गत खटला चालवला जाईल. फसवून ठेवलेल्या शारीरिक संबंधांसाठी हे कलम लागतं. जस्टिस स्वर्ण कांता शर्मा यांचं खंडपीठ एका आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करत होतं. त्याच्यावर महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवून लग्नाच्या आश्वासनावरुन मागे फिरण्याचा आरोप होता. आरोपी 4 जानेवारीपासून न्यायालयीन कोठडीत आहे. कोर्टाने आरोपीचं म्हणणं फेटाळून लावलं. हे नातं परस्पर सहमतीने होतं. दोघे परस्परांना आठ वर्षांपासून ओळखत होते.

आपल्या लग्नात कुठलाही अडथळा येणार नाही असं आरोपीने पीडित महिलेला वारंवार आश्वासन दिल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आलं. यात कुंडली जुळवण्याचा मुद्दा सुद्धा होता. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं की, पीडितेने नोव्हेंबर 2025 मध्ये पहिल्यांदा तक्रार दिली होती. आरोपी आणि त्याच्या कुटुंबाने लग्नाचं आश्वासन दिल्यानंतर तिने तक्रार मागे घेतली होती.

हा फक्त नातं बिघडण्याचा विषय नाहीय

त्यानंतर पुन्हा कुंडली जुळत नसल्याचं कारण देऊन लग्नाला नकार दिला. जानेवारी 2026 मध्ये या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (रेप) आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 69 अंतर्गत केस नोंदवण्यात आली. कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं की, हा फक्त नातं बिघडण्याचा विषय नाहीय. आरोपीने जो शब्द दिला, त्याच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं.

कोर्टाने काय म्हटलं?

सध्याची केस एक वेगळं प्रकरण आहे. आधी शब्द द्यायचा मग कुंडलीचं कारण देऊन लग्नापासून मागे हटायचं. हे गुन्ह्याच्या श्रेणीत येतं असं जस्टिस स्वर्ण कांता शर्मा म्हणाल्या. कोर्टाने आरोपीचा जामीन अर्जही फेटाळून लावला.

कुटुंबाच्या कुंडलीच्या अटीची माहिती होती, तर…

आरोपांचं गांभीर्य आणि चौकशी दरम्यान मिळालेले पुरावे लक्षात घेऊन आरोपीला दिलासा देण्याच्या विचारात नाहीय हे कोर्टाने स्पष्ट केलं. या प्रकरणात अजून आरोपपत्र दाखल झालेलं नाही ही बाब सुद्धा कोर्टाने ध्यानात घेतली. आरोपीला जर आपल्या कुटुंबाच्या कुंडलीच्या अटीची माहिती होती, तर त्याने वारंवार खोटं आश्वासन द्यायला नको होतं हे कोर्टाने स्पष्ट केलं.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?