‘बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…’, भाचीला सुसाइड नोट पाठवत बॉडी बिल्डरने स्वतःलाच घातली गोळी

बॉडी बिल्डरने स्वतःलाच गोळ्या झाडून ठार केल्यानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळा... धक्कादायक वास्तव म्हणजे, स्वतःला संपवण्यापूर्वी त्याने भाचीला सुसाइड नोट पाठवली... ज्यामध्ये बायकोने माझ्या मृतदेहाला हात देखील लावायचा नाही... असं म्हटलं आहे... सध्या पोलील या प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत.

बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा..., भाचीला सुसाइड नोट पाठवत बॉडी बिल्डरने स्वतःलाच घातली गोळी
| Updated on: Aug 03, 2026 | 12:22 PM

सर्वांसमोर आनंदी आणि उत्साही राहणाऱ्या व्यक्तीच्या मनात काय सुरु आहे आणि खासगी आयुष्यात तो कोणत्या गोष्टींचा सामना करत आहे… काहीही कळत नाही. पण त्याच व्यक्तीबद्दल एके दिवशी धक्कादायक माहिती समोर येते… असंच काही उत्तर प्रदेश येथील सहारपूर येथे राहणाऱ्या व्यक्तीसोबत झालं आहे. 52 वर्षीय देवदत्त शर्मा यांनी स्वतःला गोळ्या झाडत आयुष्य संपवलं आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते कॉलेजमध्ये क्लर्क होते आणि जिम संचालक देखील होते. देवदत्त शर्मा यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं. पण पोलिसांनी त्यांनी मृत घोषित केलं.

समोर आलेल्या माहितीनुसार, देवदत्त शर्मा एका कॉलेजमध्ये क्लर्क होते आणि त्यानंतर घरामागे असलेल्या जिममध्ये देखील काम करायचे. देवदत्त शर्मा यांच्या मृत्यूनंतर चौकशीसाठी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलाय. सहाय्यक सर्कल अधिकारी पवन कुमार यांच्या माहितीनुसार, या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. पोलीस या घटनेच्या सर्व पैलूंचा तपास करत आहेत.

तपासादरम्यान असं समोर आलं आहे की, आत्महत्या करण्यापूर्वी देवदत्त शर्मा यांनी त्यांची 21 वर्षीय भाची नेहा शर्मा हिच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला होता. या मेसेजमध्ये त्यांनी दीर्घकाळापासून आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची भावना व्यक्त केली होती. मेसेजमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, हा अपमान आता सहन होण्यापलीकडे गेला आहे आणि सतत मरत जगण्यापेक्षा मी एकदाच माझं आयुष्य संपवत आहे…

धक्कादायक गोष्ट म्हणजे देवदत्त शर्मा यांनी मेसेजमध्ये शेवटची इच्छा देखील व्यक्त केली आहे. बायकोला माझ्या मृतदेहाला हात देखील लावू देऊ नका. अंतिमसंस्कारासाठी जास्त खर्च करु नका… त्याचप्रमाणे, माझ्या आत्म्याच्या शांतीसाठी कोणत्या धार्मिक विधी करण्याची गरज नाही…, असं देखील देवदत्त शर्मा मेसेजमध्ये म्हणाले आहेत.

एवढंच नाही तर, मेसेजमध्ये देवदत्त यांनी आपला आत्मा भटकत राहावा, अशी इच्छाही व्यक्त केली होती. तसेच, त्यांनी त्यांच्या भाचीला त्याच्या आईची काळजी घेण्यास सांगितलं. या मेसेजची माहिती समोर आल्यानंतर कुटुंबात खळबळ उडाली. या घटनेशी संबंधित परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना, पोलीस आता या मेसेजकडे तपासाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून पाहत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us