AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जबलपूरात होणार RSS च्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक, कोणत्या मुद्यांवर होणार चर्चा ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान मध्य प्रदेशातील जबलपूरात होणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत आणि सहकार्यवाह दत्रात्रेय होसबाळे या बैठकीत सामील होणार आहेत.

जबलपूरात होणार RSS च्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक, कोणत्या मुद्यांवर होणार चर्चा ?
| Updated on: Oct 14, 2025 | 4:42 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाची बैठक येत्या ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान जबलपूर येथे होणार आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे या बैठकीत सामील होणार आहेत. बैठकीत संघाच्या शताब्दी वर्षाची तयारी, संघटनात्मक विस्तार आणि भविष्याचे लक्ष्य आणि समसामायिक विषयांवर विस्तृत चर्चा केली जाणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS)दरवर्षी होणारी अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक यावर्षी ३०-३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे. ही बैठक दीपावली नंतर मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्यावतीने जारी केलेल्या वक्तव्यात ही माहिती देण्यात आली आहे.

या संदर्भात जारी केलेल्या माहितीनुसार अखिल भारतीय कार्यकारी मंडळातील संघ रचनेच्या सर्व ४६ प्रांताचे प्रांत संघचालक, कार्यवाह तसेच प्रचारक तसेच सह प्रांत संघचालक, कार्यवाह तसेच प्रचारक सामील होणार आहेत. बैठकीत संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे तसेच सर्व सहा सह सरकार्यवाह आणि अन्य अखिल भारतीय कार्य विभाग प्रमुखांसहित कार्यकारिणीचे सदस्य देखील उपस्थित राहणार आहेत.

कोणत्या मुद्यांवर होणार चर्चा

आरएसएसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की संघाच्या शताब्दी वर्षांचा शुभारंभ अलिकडे विजयादशमीच्या पवित्र सणाला नागपूरसह देशभरात आयोजित विशेष उत्सवाद्वारे करण्यात आला. या निमित्ताने सरसंघचालकांच्या उद्बोधनात महत्वपूर् मुद्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

बैठकीत शताब्दी वर्षाच्या सर्व कार्यक्रमाची आता पर्यंतच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. बैठकीत सर्व प्रांत आपल्या शताब्दी योजनांच्या संदर्भात विस्तृत वृत्त तसेच विवरण सादर करतील. वर्तमान काळातील समसामायिक विषयांवर उपस्थित कार्यकर्त्यांद्वारा व्यापक विचार-विनिमय देखील बैठकीचा महत्वपूर्ण भाग असेल.

वार्षिक कामकाजाचा आढावा, योजना ठरवणार

निवदेनात म्हटले आहे की नेहमीप्रमाणे वर्ष २०२५-२६ च्या निर्धारित वार्षिक योजनांचा आढावा तसेच संघ कार्याचा विस्ताराचा वृत्तांत देखील घेतला जाणार आहे. बैठकीत विशेष करुन संघ शताब्दी निमित्त सुनिश्चित संघटनात्मक लक्ष्यांना विजयादशमी २०२६ पर्यंत पूर्ण करण्यासंदर्भात विचार -विनिमय केला जाईल.

बयान में कहा गया है कि हमेशा की भांति वर्ष 2025-26 की निर्धारित वार्षिक योजना की समीक्षा तथा संघ कार्य के विस्तार का वृत्तांत भी लिया जाएगा. बैठक में विशेष कर संघ शताब्दी निमित्त सुनिश्चित संगठनात्मक लक्ष्यों को विजयादशमी 2026 तक पूर्ण करने के संबंध में विचार-विमर्श होगा.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.