AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरातमध्ये ठरणार ‘बंगाल स्वारी’चं मॉडल; भाजप-संघाची आजपासून तीन दिवस बैठक

पश्चिम ब्ंगालमध्ये प्रचाराचा धुरळा उडवून दिल्यानंतर आता बंगाल स्वारीचं मॉडल तयार करण्याच्या कामाला भाजप लागली आहे. (RSS, BJP to meet in Ahmedabad ahead of West Bengal polls)

गुजरातमध्ये ठरणार 'बंगाल स्वारी'चं मॉडल; भाजप-संघाची आजपासून तीन दिवस बैठक
| Updated on: Jan 05, 2021 | 10:59 AM
Share

अहमदाबाद: पश्चिम ब्ंगालमध्ये प्रचाराचा धुरळा उडवून दिल्यानंतर आता बंगाल स्वारीचं मॉडल तयार करण्याच्या कामाला भाजप लागली आहे. आज मंगळवारपासून गुजरातमध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महत्त्वाच्या नेत्यांची अहमदाबादमध्ये बैठक होणार आहे. तीन दिवसांच्या या बैठकीत पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक जिंकण्याची रणनीती ठरविण्यात येणार आहे. (RSS, BJP to meet in Ahmedabad ahead of West Bengal polls)

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाच्या 36 अनुषांगिक संघटनांचे प्रतिनिधी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा, भाजपचे महासचिव बीएल संतोष यांच्यासह अनेक नेते या बैठकीमध्ये सहभाही होणार आहे. या तीन दिवसांच्या बैठकीत बंगाल जिंकण्याची रणनीती ठरवण्याबरोबरच कृषी कायदे, शेतकरी आंदोलन आणि राम मंदिराच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे.

नड्डा गुजरातच्या नेत्यांना भेटले

या बैठकीला हजर राहण्यासाठी जेपी नड्डा गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. विमानतळावरून ते थेट भाजप कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी गुजरा प्रदेशाध्यक्षांसह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी गुजरामधील पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. तसेच बंगालच्या निवडणूक प्रचारात भाग घेऊ इच्छिणाऱ्या गुजराती नेत्यांच्या नावावरही चर्चा करण्यात आली.

बंगाल जिंकण्याच्या प्लानवर चर्चा

अहमदाबादच्या कर्णावती कॉलेजमध्ये संघ आणि भाजपची बैठक होणार आहे. यंदा पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पैकी पुद्दुचेरी आणि आसाममध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तर पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि केरळमध्ये डाव्यांची सत्ता आहे. तर तामिळनाडूत एआयएडीएमकेची सत्ता आहे. त्यामुळे या पाचही राज्यात भाजपचा कस लागणार आहे. (RSS, BJP to meet in Ahmedabad ahead of West Bengal polls)

संघ बंगालमध्ये 1939 सालापासून कार्यरत आहे. या ठिकाणी डाव्यांची 34 वर्ष सत्ता होती. त्यामुळे डाव्यांच्या काळात संघ बंगालमध्ये हातपाय पसरू शकला नाही. 2011मध्ये डाव्यांची सत्ता गेली. त्यानंतर केंद्रात 2014मध्ये मोदींची सत्ता आली. त्यानंतर संघाने बंगालमध्ये हातपाय पसरण्यास सुरुवात केली. त्याचे परिणाम 2019च्या लोकसभा निवडणुकीतही पाहायला मिळाले. (RSS, BJP to meet in Ahmedabad ahead of West Bengal polls)

संबंधित बातम्या:

LIVE | किरीट सोमय्यांचा मोठा आरोप, सेनेची माजी खासदार आनंदराव अडसूळ ED च्या रडारवर

नव्या संसद भवनाबाबत आज निर्णयाची शक्यता, कसं असेल नवं संसद भवन?

बंगालमध्ये पुन्हा राजकीय हिंसाचार, भाजपच्या बड्या नेत्याच्या रॅलीवर जोडे-चप्पल आणि दगडफेक

(RSS, BJP to meet in Ahmedabad ahead of West Bengal polls)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं