‘कन्हैया जैसा कर देंगे हाल’ धर्मांतरावरुन आरएसएस प्रमुखाला धमकी…

आरएसएस प्रचारकाला धर्मांतर कर नाही तर कन्हैयालाल टेलरसारखी तुझीही परिस्थिती करतो असा धमकीचा फोन थेट पाकिस्तानातून आल्याची तक्रार नोंदवली आहे.

कन्हैया जैसा कर देंगे हाल धर्मांतरावरुन आरएसएस प्रमुखाला धमकी...
महादेव कांबळे | Updated on: Oct 26, 2022 | 6:14 PM

नवी दिल्लीः राजस्थानमधील बारन (Baran in Rajasthan) जिल्ह्यात शेजारील पाकिस्तानमधील फोन नंबरवरून आरएसएसच्या जिल्हा प्रचारकाला धमकीचे फोन आल्याचे प्रकरण उघड झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) प्रचारकाला काहीही कारण नसताना धर्मांतरावरुन धमकी देण्यात आली आहे. फोनवरुन धमकी (life threatening  call)  देणाऱ्या व्यक्तीने तू जर धर्मांतर केले नाहीस तर तुझी अवस्था उदयपूरच्या कन्हैयालालसारखी असंही त्या व्यक्तीने धमकी देताना म्हटले आहे.

या घटनेनंतर तात्काळ संबंधित व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी बारनच्या छिपाबरोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटकही करण्यात आली आहे.

आरएसएस प्रचारक असणाऱ्या व्यक्तीला ज्यावेळी पाकिस्तानातून धमकीचा फोन आला त्यावेळी धर्मांतरावरुनच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

त्यामुळे त्या व्यक्तीने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे दोघांना अटकही केली गेली आहे.

22 ऑक्टोबर रोजी आरएसएसचे जिल्हा प्रचारक रामेश्वर यांनी छिपाबारोड पोलिस स्टेशनमध्ये धमकीचे फोन आल्याची तक्रार दाखल केली होती.

तक्रार आल्यानंतर एसपी कल्याण माल मीना स्वत: या प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचवेळी मुस्लिम धर्म स्वीकारला नाही तर कन्हैया लालसारखीच तुमचीही अवस्था करणार असल्याची धमकीच देण्यात आल्याचे सांगितले.

त्याचवेळी पोलिसांनी सायबर सेल आणि टेक्नोक्रॅटची मदत घेऊन धमकीच्या कॉलचा तपास करून अखेर आरोपींचा शोध लावण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी गावातील गिरराज या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर तरुणासह एका अल्पवयीनालाही अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Follow Us