AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्ध चालू असतानाच भारतासाठी मोठी गुड न्यूज, ऐन संकटात मित्र मदतीला धावला; मोठं टेन्शन मिटलं!

Oil : इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर ताबा मिळवला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्चा तेलाचा पुरवठा रोखला गेला आहे. या संकटाच्या काळात भारताचा मित्र मदतीला धावून आला आहे.

युद्ध चालू असतानाच भारतासाठी मोठी गुड न्यूज, ऐन संकटात मित्र मदतीला धावला; मोठं टेन्शन मिटलं!
OIL RussianImage Credit source: Google
| Updated on: Mar 04, 2026 | 10:34 PM
Share

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. अमेरिका आणि इस्रायल सतत इराणवर हल्ले करत आहे. यामुळे संतापलेल्या इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर ताबा मिळवला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्चा तेलाचा पुरवठा रोखला गेला आहे. यामुळे भारतासह जगभरातील देशांमध्ये इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसण्याची शक्यता आहे. या संकटाच्या काळात रशियाने भारताला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरफॅक्स वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी रशिया चीन आणि भारताला तेल पुरवठा वाढविण्यास तयार आहे असं विधान केले आहे. त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.

भारतात किती प्रमाणात रशियन तेल आयात करतो?

फेब्रुवारीमध्ये रशिया हा भारताचा सर्वात मोठा कच्चा तेल पुरवठादार देश होता. केप्लरच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीमध्ये रशियाची आयात 1 अब्ज डॉलर्सपेक्षा थोडी कमी होती, जी जानेवारीमध्ये 1.1 अब्ज डॉलर्स होती. तर याच काळात भारताने सौदी अरेबियाकडून 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे तेल खरेदी केले होते. आता मार्चमध्ये भारत रशियाकडून जास्त तेल खरेदी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयातीतही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इराणचा इशारा

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने जगभरातील तेल आणि वायूच्या वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवले आहे. गार्ड्स नेव्हीचे अधिकारी मोहम्मद अकबरजादेह यांनी सांगितले की, “सध्या, होर्मुझची सामुद्रधुनी इस्लामिक रिपब्लिकच्या नौदलाच्या पूर्ण नियंत्रणाखाली आहे.” पुढे बोलताना त्यांनी इशारा दिला की, या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांना क्षेपणास्त्रे किंवा ड्रोन हल्ल्यांचा सामना करावा लागू शकतो.

भारताला मोठा फटका

भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी दररोज सुमारे 250.7 दशलक्ष बॅरल तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येते. प्रामुख्याने इराक, सौदी अरेबिया, युएई आणि कुवेत येथून येणारे तेल या मार्गाने येते. मात्र आता या प्रदेशात सुरू असलेल्या लष्करी हल्ल्यांमुळे मालवाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारत पर्यायी तेलाच्या शोधात होता आणि आता रशियाने तेलाचा पुरवठा वाढवण्यास नकार दिला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...