AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अमेरिकेनं दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच उचललं मोठं पाऊल, तिसरं महायुद्ध होणार? जग भयंकर संकटात

इराण, इस्त्रालय आणि अमेरिकेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाने जगाची चिंता वाढवली आहे. दरम्यान त्यातच आता अमेरिकेनं असं पाऊल उचललं आहे, त्यामुळे आता तिसरं महायुद्ध जवळ आलं आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोठी बातमी! अमेरिकेनं दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच उचललं मोठं पाऊल, तिसरं महायुद्ध होणार? जग भयंकर संकटात
donald trumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 04, 2026 | 9:29 PM
Share

अमेरिका,इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरूच असून, यामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. जोपर्यंत युद्धाचा उद्देश पूर्ण होणार नाही, तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहणार अशी थेट घोषणाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान आज या युद्धाचा पाचवा दिवस आहे. आतापर्यंत अमेरिकेनं आणि इस्त्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यांच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत, अमेरिकेकडून इराणवर धडकी भरवणारे हल्ले करण्यात आले. तर इराण देखील काही कमी नाही, इराणने देखील अमेरिका आणि इस्त्रायलवर प्रचंड मोठे हल्ले केले आहेत. इराणकडून तर इस्त्रायलच्या पंतप्रधानांचं कार्यालय देखील लक्ष्य करण्यात आलं.

दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेनं प्रथमच असं पाऊल उचललं आहे, त्यामुळे आता जग तिसऱ्या महायुद्धाच्या जवळ आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भारतामधून इराणमध्ये परतत असलेली वॉरशिप अमेरिकेनं हिंदी महासागरात बुडवली आहे. या घटनेला अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून देखील दुजोरा देण्यात आला आहे. श्रीलंकेच्या समुद्र किनाऱ्यावर एक वॉरशिप बुडालं त्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केल्याची माहिती श्रीलंकेच्या नौदलाने दिली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या जहाजावरील 101 जण बेपत्ता आहेत, तर 78 जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान याबाबत आता अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानं माहिती देताना सांगितलं की, अमेरिकेची पानबुडी टारपीडोने हल्ला करत आम्ही इराणचं वॉरशिप बुडवलं. विशेष म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर तब्बल 80 वर्षांनंतर अमेरिकेनं या पद्धतीचा पहिला हल्ला केला आहे.यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, ही किती मोठी घटना आहे. त्यामुळे आता जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं जात आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेमुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच या युद्धामुळे भीषण इंधन संकट देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...