आधी एक, आता दोन मतं, जन्मत: डोक्याने जोडलेल्या बहिणींनी हक्क बजावला!

पटना : बिहारच्या पटना मतदारसंघात डोक्याने जोडलेल्या दोन बहिणींना वेगवेगळं मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे. या बहिणींनी त्यांना वेगवेगळं मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. निवडणूक आयोगाने या बहिणींची मागणी मान्य करत त्या दोघींनाही मतदानाचा हक्क दिलेला आहे. सबा आणि फराह नावाच्या या बहिणींना यंदाच्या निवडणुकीत दोन वेगवेगळे मतदार कार्ड …

आधी एक, आता दोन मतं, जन्मत: डोक्याने जोडलेल्या बहिणींनी हक्क बजावला!

पटना : बिहारच्या पटना मतदारसंघात डोक्याने जोडलेल्या दोन बहिणींना वेगवेगळं मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे. या बहिणींनी त्यांना वेगवेगळं मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. निवडणूक आयोगाने या बहिणींची मागणी मान्य करत त्या दोघींनाही मतदानाचा हक्क दिलेला आहे. सबा आणि फराह नावाच्या या बहिणींना यंदाच्या निवडणुकीत दोन वेगवेगळे मतदार कार्ड जारी करण्यात आले. सबा आणि फराहने पटनामध्ये मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक आयोगाकडून मतदारांमध्ये मतदानासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी काम करणाऱ्या ट्विटर हँडल ‘स्वीप’ने या दोन बहिणींचे फोटो ट्वीट केले. यामध्ये त्या त्यांचं मतदार कार्ड आणि बोटावरील शाही दाखवत आहेत.

पटना येथे 22 वर्षांपूर्वी सबा आणि फराह या दोन बहिणींचा जन्म झाला. या बहिणी डोक्याने एकमेकांशी जोडलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी दिल्लीच्या एका रुग्णालयात शस्त्रक्रिया करुन सबा आणि फराहला वेगळं करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, ते यशस्वी झाले नाहीत. सबा आणि फराहचं डोकं सोडून संपूर्ण शरीर वेगवेगळं आहे. त्यामुळे यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने या दोन्ही बहिणींना एकच मतदार कार्ड जारी केलं होतं. या दोन्ही बहिणींचं एकच ओळखपत्र होतं.

निवडणूक आयोगानुसार, या दोन्ही बहिणींचं शरीर वेगवेगळं असलं तरी त्या मानसिकदृष्ट्या एकच आहेत. त्यामुळे त्यांना एकत्र मतदानाचा हक्क देण्यात आला होता. मात्र, यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने या दोन्ही बहिणींना वेगवेगळं मत देण्याचा अधिकार मिळाला.

शेवटच्या टप्प्यातील मतदान

लोकसभा निवडणूक 2019 च्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीचं मतदान आज पार पडत आहे. या अंतिम टप्प्यात आठ राज्यातील 59 जागांसाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात 10 कोटी 17 लाखांपेक्षा अधिक नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील. पंजाबामधील 13, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 9, बिहार मधील 8, हिमाचल प्रदेशातील 4, झारखंडमधील 4 चंडीगढ 1 या ठिकाणी आज मतदान पार पडत आहे. या टप्प्यात तब्बल 918 उमेदवार 59 जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

VIDEO :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *