AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजच प्लानिंग करा, नाहीतर देशातल्या या मोठ्या बँकेतून 6 दिवस पैसेच काढता येणार नाही, बँक राहणार बंद; तारखा चेक केल्या का?

आपली अनेक कामं बँकांवर आधारलेली असतात. पण आता देशातल्या या मोठ्या बँकेतून 6 दिवस पैसेच काढता येणार नाही... बँक बंद राहणार आहे... एकदा तारखा चेक करा आणि आजच पुढचं प्लानिंग करा...

आजच प्लानिंग करा, नाहीतर देशातल्या या मोठ्या बँकेतून 6 दिवस पैसेच काढता येणार नाही, बँक राहणार बंद; तारखा चेक केल्या का?
| Updated on: May 22, 2026 | 3:07 PM
Share

SBI Bank Holidays: जी बँक एक दोन नाही तर तब्बल सहा दिवस बंद राहणार आहे, त्या बँकेचं नाव भारतीय स्टेट बँक (SBI) आहे. त्यामुळे या बँकेच्या कोणत्याही ब्रँचमध्ये तुमचं खातं असेल तर, आजच प्लानिंग करा. मिळालेल्या माहितीनुसार, 23 मे 2026 पासून सहा दिवसांसाठी बँकेच्या शाखा बंद राहतील आणि ही बंदी देशभरात वाढवली जाऊ शकते, असं देखील सांगण्यात येत आहे. मात्र, ऑनलाइन सेवा सुरळीत सुरू राहतील, ज्यामुळे तुम्हाला नेट बँकिंग, एटीएम, मोबाइल बँकिंग आणि इतर सेवा वापरता येतील. मात्र, जर तुम्हाला एसबीआय शाखेत कोणतंही काम करायचं असेल, तर ते 23 मे पूर्वी करून घ्या…

6 दिवसांसाठी बँक का राहणार आहे बदं?

SBI बँक सहा दिवस बंद राहणार आहे. कारण वीकेंड, प्रस्तावित दोन दिवसांचा संप आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ईद-उल-अझहा (बकरीद) निमित्त जाहीर केलेली दोन दिवसांची सुट्टी. आरबीआयच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील बँका बकरीदच्या निमित्ताने 27 आणि 28 मे असे दोन दिवस बंद राहतील. 23 मे रोजी महिन्याचा चौथा शनिवार आहे, त्यामुळे त्या दिवशी बँका बंद राहतील. रविवार असल्यामुळे 24 मे रोजी सर्व एसबीआय बँका बंद राहतील, त्यामुळे हा आठवडा दोन दिवसांच्या वीकेंडचा असेल.

केव्हा आणि का होणार संप?

SBI स्टाफ फेडरेशनने 25-26 मे रोजी म्हणजे सोमवार आणि मंगळवारी प्रस्तावित संपाची घोषणा केली आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) फंड व्यवस्थापकांची भरती आणि निवड यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. एसबीआय कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना, ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशनने देखील जॉब आउटसोर्सिंग, एसबीआयमधील समानतेचे मुद्दे, करिअर प्रगती योजनांचा आढावा, एचआरएमएस आणि कर्मचाऱ्यांवर परिणाम करणाऱ्या इतर समस्यांवर चिंता व्यक्त केली आहे.

ऑनलाईन सेवा राहतील सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, SBI कर्मचारी देखील संपात सहभागी होऊ शकतात. शाखांचं कामकाज थांबवलं जाऊ शकतं, परंतु ऑनलाइन सेवा सुरू राहतील. एसबीआय ऑनलाइन बँकिंग, यूपीआय पेमेंट आणि एटीएम नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ