सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अडचणीत मोठी वाढ, आता काही खरं नाही, थेट जेलमध्ये बाहेर येताच..

कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोठे आंदोलन पुकारले. मात्र, त्यांच्या आंदोलनापूर्वीच दिल्ली पोलिसांनी मोठा गेम केला. त्यातच सीजेपीच्या नेत्यांच्या समस्या या काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत.

सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अडचणीत मोठी वाढ, आता काही खरं नाही, थेट जेलमध्ये बाहेर येताच..
Ashutosh Ranka and Saurav Das
| Updated on: Oct 22, 2026 | 9:16 AM

कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन पुकारले. मात्र, दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके आणि त्यांच्यासह वरिष्ठ नेते दिल्ली विमानतळावर पोहोचताच त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अटक करून न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले. त्यांना काही नियम आणि अट देऊन जामीन मंजूर झाला. मात्र, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी जामीन मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बॉन्डचे उल्लंघन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना परत अटक करून न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांना थेट जेलमध्ये पाच दिवसांसाठी पाठवण्यात आले. यासोबतच काल हायकोर्टाने सीजेपीच्या नेत्यांना चांगलेच फटकारले आहे. यासोबतच कोर्टानी त्यांना आठवण करून देत सांगितले की, तुम्ही जेंनझी नाहीत, हे लक्षात ठेवा. यासोबतच कोर्टाने म्हटले की, भारताच्या बाहेर काय सुरू आहे, याची तुम्हाला कल्पना तरी आहे का?

पहिल्या दिवशी तुम्ही जामीन घेता आणि त्याचे उल्लंघन दुसऱ्याच दिवशी करता. अभिजीत दिपके यांनीही दिल्लीत मोर्चा काढला होता, त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केले पण त्यांना दुसऱ्यांदा जामीन मिळाला. सीजेपीने आपल्या कार्यकर्त्यांना दिल्ली न सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. दोन ते चार दिवसात मोठे आंदोलन उभारून असेही त्यांनी म्हटले होते.

Loading...

पण सीजेपीच्या नेत्यांची काही समस्या दूर होताना दिसत नाही. यासोबतच अभिजीत दिपके यांना विदेशातून फंडिंग मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच आता दिल्ली क्राईम ब्रांचने सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना नोटीस दिली आहे. क्राईम ब्रांचने सौरभ दास आणि रांका यांना चौकशीसाठी बोलवले आहे.

दुपारी 12 वाजता दोघांचीही होणार चौकशी केली जाईल. त्यातच अभिजीत दिपके देखील दिल्लीत असल्याची माहिती मिळतंय. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने मोठे आंदोलन देशभरात उभारले. पण यावेळी त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले नाही. दिल्ली पोलिसांनी त्यांचे हे आंदोलन हाणून पाडले. दिल्लीत मोठ्या प्रमाणात सीजेपीच्या कार्यकर्त्यांची धरपकडही झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us