AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसमध्ये असलेल्या बायकोला भाजपतं आणलं, खासदार बनल्यानंतर तिने पतीला दिला घटस्फोट, 2017 साली झालेलं लग्न

2016 साली काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती. 2019 साली काँग्रेसची साथ सोडून त्या भाजपमध्ये दाखल झाल्या. त्यांनी 2019 आणि 2024 साली शहडोलमधून लोकसभेची निवडणूक जिंकली.

काँग्रेसमध्ये असलेल्या बायकोला भाजपतं आणलं, खासदार बनल्यानंतर तिने पतीला दिला घटस्फोट, 2017 साली झालेलं लग्न
bjp mp himadri singh
| Updated on: Sep 15, 2026 | 11:01 AM
Share

मध्य प्रदेश शडहोलच्या खासदार हिमाद्री सिंह यांनी व्यक्तिगत आयुष्यात एक मोठा निर्णय घेतला आहे. हिमाद्री सिंह यांनी पती नरेंद्र सिंह मरावी यांना घटस्फोट दिला आहे. हिमाद्री सिंह दोनवेळच्या खासदार आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून हिमाद्री सिंह आणि नरेंद्र सिंह मरावी दोघे वेगवेगळे राहत होते. 23 नोव्हेंबर 2017 रोजी अूनपपूर जिल्ह्यातील पुष्पराजगढ येथे दोघांचं लग्न झालेलं. दोघांना गिरिशा कुमारी सिंह मुलगी आहे. ती हिमाद्री यांच्याजवळ राहते. हिमाद्री सिंह या मध्य प्रदेशातील मोठ्या आदिवासी कुटुंबातून येतात. त्यांचे वडिल दलवीर सिंह हे काँग्रेसमध्ये मोठे आदिवासी नेते होते. राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री होते. त्यांची आई रादेश नंदिनी या कोतमामधून आमदार आणि शहडोलच्या खासदार होत्या. हिमाद्री यांच्या आई-वडिल दोघांचं निधन झालं आहे.

हिमाद्री सिंह यांनी 2016 साली काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती. 2019 साली काँग्रेसची साथ सोडून त्या भाजपमध्ये दाखल झाल्या. त्यांनी 2019 आणि 2024 साली शहडोलमधून लोकसभेची निवडणूक जिंकली. हिमाद्री यांचं शिक्षण दिल्लीत झालं आहे. देशातील प्रमुख युवा आदिवासी नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. अलीकडेच त्यांनी उज्बेकिस्तानच्या समरकंद येथे आयोजित जगभरातील युवा खासदारांच्या सम्मेलनात भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं.

पत्नीच्या आई विरोधात लढवलेली लोकसभेची निवडणूक

हिमाद्री सिंह यांचे पती नरेंद्र सिंह मरावी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपाशी संबंधित आहेत. त्यांनी 2009 साली हिमाद्री यांची आई राजेश नंदिनी सिंह यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवलेली. त्यावेळी नरेंद्र सिंह यांचा पराभव झालेला. नरेंद्र मरावी हे अनुसूचित जनजाति आयोगाचे अध्यक्ष होते. हिमाद्री यांना काँग्रेसमधून भाजपामध्ये आणण्यात नरेंद्र मरावी यांची भूमिका महत्वाची होती.

राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

हिमाद्री आणि नरेंद्र मागच्या अनेक वर्षांपासून वेगळे राहत होते. दोघे सेप्रेट राहत असल्याचं समजल्यानंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या. 2024 लोकसभा निवडणुकीच्यावेळी नरेंद्र सिंह मरावी यांनी भाजपकडून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला होता. वेळेबरोबर हिमाद्री सिंह यांचं राजकीय वजन वाढत गेलं. भाजपच्या राजकारणात नरेंद्र मरावी यांचा प्रभाव कमी होत गेला.

Follow Us
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन