AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन नवरात्रीत भीषण अपघात, देवीच्या मंदिरात जाण्याआधी वाटेतच भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; 13 जण ठार

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये शीतला माता मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर भयंकर अपघात झालाय. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

ऐन नवरात्रीत भीषण अपघात, देवीच्या मंदिरात जाण्याआधी वाटेतच भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; 13 जण ठार
mp accident Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 18, 2026 | 8:36 AM
Share

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये शीतला माता मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर भीषण अपघात झाला आहे. नवरात्रीनिमित्त मंदिराकडे जाणाऱ्या अनेक भाविकांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 39 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी डॉक्टरांनी 13 जणांना मृत घोषित करण्यात आलं आहे. जखमींमध्ये दोन पोलिसांचा देखील समावेश आहे.

पोलीस अधिकारी धर्मवीर सिंह यांनी सांगितलं की, छिनोरहून मंदिराकडे जाणारा रस्ता हा उताराचा आहे. या मार्गावर अवजड वाहनांना बंदी आहे. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास एक ट्रकला पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु याचवेळी चालकाने ट्रकवरील नियंत्रण गमावलं. त्यानंतर ट्रकने पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले. उतारावरून हा ट्रक मंदिराच्या बाहेरील भिंत आणि प्रवेशद्वाराला धडकला. पुढे या ट्रकने रस्त्यावरील भाविकांना ट्रकखाली चिरडले.

दोन जखमी पोलिसांवर उपचार सुरू 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर एकूण 39 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच ते सहा रुग्ण गंभीर जखमी झाले आहेत. अनेकांची हाडे देखील मोडली आहेत. उर्वरित भाविक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर कर्तव्यावर असलेले दोन पोलीस अधिकारी देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

ग्वाल्हेरच्या जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी सांगितलं की, पहाटे दीडच्या सुमारास एक ट्रक नियंत्रणाबाहेर गेला. या ट्रकने अनेकांना चिरडलं. घटनेनंतर रुग्णवाहिका, इतर वाहने तात्काळ घटनास्थळी पोहोचले. या अपघातात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जखमींचे सीटी स्कॅन आणि एक्स-रे काढण्याचे काम सुरू आहे. ग्वाल्हेर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, नवरात्रीदरम्यान रस्त्यावर बॅरिकेट्स लावण्यात आले होते. तिथेच पोलिसांनी नाके उभारले होते. या नाक्याजवळ वाहनांच्या तपासणीसाठी आरटीओचं पथक तैनात होतं. या नाक्याजवळ चालकाने ट्रकवरील नियंत्रण गमावलं. त्यानंतर ट्रक बॅरिकेट्स तोडून पुढे गेला. या अपघातानंतर चौहान यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Follow Us
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका