AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shraddha Walkar हत्याकांडातील आरोपी आफताब याचा एमएचा पेपर, कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली

साल २०२२ मध्ये घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवले होते. आफताब अमीन पुनावाला याने श्रद्धा वालकर हीची निर्घृण पद्धतीने हत्या केल्याचा आरोप आहे.या प्रकरणात दिल्लीच्या साकेत कोर्टात त्याच्या विरोधात खटला चालू आहे.

Shraddha Walkar हत्याकांडातील आरोपी आफताब याचा एमएचा पेपर, कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली
Shraddha Walkar Murder Case
| Updated on: Jul 11, 2026 | 6:25 PM
Share

Shraddha Walkar Murder Case: देशाला हादरवणारे श्रद्धा वालेकर हत्याकांडाची सुनावणी पुन्हा एकदा तहकूब झाली आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टाने २० जुलैची सुनावणी करण्याची तारीख रद्द केली आहे. या प्रकरणातील हत्यारा आरोपी श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने त्या दिवशी आपली एमए ( समाजशास्र ) ची परीक्षा असल्याचे कारण देत सुनावणी स्थगित करण्याची मागणी केली होती. कोर्टाने आरोपीचा हा अर्ज स्वीकारुन नवी तारीख नंतर घोषीत करु असे सांगत २० जुलै रोजीची सुनावणी पुढे ढकलली आहे.

कोर्टाने आरोपीचा अर्ज स्वीकारला

या Shraddha Walkar हत्याकांडाची सुनावणी सुरु असणाऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरगुरविंदर सिंह जग्गी यांनी आरोपीने दाखल केलेल्या अर्जावर विचार केल्यानंतर २० जुलै रोजी निश्चित केलेली सुनावणी आता पुढे ढकलली आहे.आरोपीचा त्याच दिवशी एमएचा पेपर असल्याने त्या दिवशी सुनावणी होऊ शकत नाही असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरगुरविंदर सिंह जग्गी यांनी सांगितले.

तिहार तुरुंगात परीक्षा देणार आफताब

आफताब अमीन पूनावाला याच्यावर श्रद्धा वालकर हीच्या हत्येचा खटला सुरु आहे. त्याची एमए (समाजशास्त्र) ची परीक्षा तो इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालयाच्या (IGNOU) परीक्षा तिहार जेल परिसरातील केंद्रात होणार आहे. सध्या आरोपी आफताब हा न्यायालयीन कोठडीत आहे.

2022 चे गाजलेले हत्याकांड

दिल्लीतील छत्तरपूर येथील घरात श्रद्धा वालकर हीची निर्घृण हत्या झाली होती.श्रद्धाचा खून १८ मे २०२२ रोजी करण्यात आला होता.आरोपी आफताब याने पुरावा नष्ट करण्यासाठी श्रद्धाच्या मृतदेहाचे सुमारे ३५ तुकडे केले होते. आणि ते दिल्लीतील वेगवेगळ्या जंगलात फेकून दिले होते.श्रद्धा हिच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये या प्रकरणाचा उलगडा झाला होता.

Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...