AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

karnataka Politics Siddaramaiah : राजीनाम्याची घोषणा करण्याआधी सिद्धारमैया-शिवकुमार यांच्यात बंद खोलीत काय घडलं?

karnataka Politics Siddaramaiah: कर्नाटक हे देशातील एक महत्वाचं राज्य आहे. तिथे सरकारमध्ये नेतृत्व बदल झाला आहे. काँग्रेस हायकमांडने हा निर्णय घेतला आहे. सिद्धारमैया यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे.

karnataka Politics Siddaramaiah : राजीनाम्याची घोषणा करण्याआधी सिद्धारमैया-शिवकुमार यांच्यात बंद खोलीत काय घडलं?
Shivkumar- Siddaramaiah
| Updated on: May 28, 2026 | 12:43 PM
Share

कर्नाटकात सरकारमधील नेतृत्व बदलाबाबत मागच्या अनेक दिवसांपासून जी चर्चा होती ती अखेर खरी ठरली आहे. आज सिद्धारमैया यांनी कर्नाटकच मुख्यमंत्रीपद सोडत असल्याची घोषणा केली. त्याआधी सिद्धारमैया यांनी बंगळुरुतील मुख्यमंत्री निवासस्थानी सर्व मंत्र्यांना ब्रेकफास्टसाठी बोलावलं होतं. सिद्धारमैया आणि त्यांची जागा घेणारे विद्यमान उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यात बंद दाराआड जवळपास 30 मिनिटं चर्चा झाली. यावेळी डीकेंनी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्या चरणाला स्पर्श करुन त्यांचे आशिर्वाद घेतले. सिद्धारमैया यांनी आज सर्व मंत्र्यांना नाष्ट्यासाठी बोलावलं होतं. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना नाष्ट्यासाठी बोलावलं होतं, असं कर्नाटकचे मंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितलं. “राजीनामा देण्याआधी सर्व मंत्र्यांचे त्यांनी सहकार्यासाठी आभार मानले. सिद्धारमैया यांना दिल्लीत कुठलं पद मिळणार की नाही? या बद्दल मला काही माहित नाही. हे हायकमांडवर अवलंबून आहे” असं परमेश्वर यांनी सांगितलं.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी गुरुवारी राजीनाम्याची घोषणा केली आहे, मंत्र्यांसोबत ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये त्यांनी ही माहिती दिली. दुपारी तीन वाजता राज्यपालांना भेटून ते आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत सध्या बंगळुरुमध्ये नाहीयत.

मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलेला

कर्नाटकात 2023 मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली. 23 मे रोजी सिद्धारमैया यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. डी के शिवकुमार उपमुख्यमंत्री बनले. त्यावेळी मुख्यमंत्री सिद्धारमैया आणि शिवकुमार यांच्यात एक स्पर्धा होती. पण सिद्धारमैया ओबीसी चेहरा असल्याने काँग्रेस हायकमांडने आधी त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी संधी दिली. त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलाय असं बोलल जात होतं. आता जे निर्णय झालेत, त्यावरुन ते बरोबर असल्याचं दिसतय. तीन वर्ष होतं आली तरी नेतृत्व बदल होत नव्हता. सिद्धा आणि डीके असे दोन गट पडले होते.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट