साप रात्रीच्या वेळी कधीच जवळ येणार नाही, करा फक्त आदिवासी लोकांची ही खास ट्रिक, जंगलामध्ये कसा वाचवतात जीव?
भारतामध्ये हजारो प्रजातीचे साप आढळून येतात. यातील अनेक साप हे निशाचर आहेत, म्हणजे असे साप हे केवळ रात्रीच्याच वेळी शिकारीसाठी बाहेर पडतात. त्यामुळे अनेकदा सर्पदंशाचा धोका निर्माण होतो.

भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात. यातील काही सापांच्या प्रजाती या अत्यंत विषारी आहेत, तर काही सापांच्या प्रजाती या बिनविषारी आहेत. अशा सापांपासून कोणताही धोका नसतो. परंतु साप विषारी असो, अथवा बिनविषारी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं असतं. तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला कधीही पकडण्याचा प्रयत्न करू नका, त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते सापांना सुरक्षितरित्या पकडून दूर जंगलात सोडतील. सापांबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची फारच थोड्या लोकांना माहिती आहे. भारतामध्ये सापांच्या अशा अनेक प्रजाती आहेत. ज्या दिवसा एखाद्या ठिकाणी दगडाखाली, बिळात किंवा अडोशाला लपून बसतात, आणि रात्री अंधार पडल्यानंतर शिकारीच्या शोधात बाहेर पडतात.
अशा सापांना निशाचर असं देखील म्हटलं जातं. जे साप शिकारीसाठी रात्रीच्या वेळी बाहेर पडतात त्यातील अनेक सापांच्या प्रजाती या विषारी आहेत. हे साप रात्रीच्यावेळी शिकारीसाठी बाहेर पडत असल्यामुळे सर्पदंशाचा धोका अधिक वाढतो, कारण रात्री आपण झोपेत असतो. त्यामुळे अनेकदा हे साप आपल्या अंथरुणामध्ये देखील घुसतात, अशावेळी आपली थोडजरी हालचाल झाली तर सर्पदंश होऊ शकतो.
रात्रीच्यावेळी सापांपासून संरक्षण व्हावं यासाठी आदिवासी लोक एक विशेष ट्रिक वापरतात. ग्रामीण भागात किंवा दुर्गम भागात शेतात घर असलेले लोक कधीही जमिनीवर झोपत नाहीत. ते नेहमी बाज किंवा पलंगावर झोपतात. शक्यतो अशी बाज किंवा पलंग हे भिंतीपासून विशिष्ट अंतरावर असते, म्हणजे ते कधीही भिंतींना खेटून झोपत नाहीत. तसेच ते ज्या बाजेवर झोपतात, त्या बाजेच्या पायांना ते आवर्जून तेलकट पदार्थ लावतात. यामुळे सापांना बाजेरवर चढता येत नाही. बाजेवर चढण्याचा प्रयत्न केल्यास साप खाली घसरतो. त्यामुळे तो बाजेवर चढण्याचा प्रयत्न करत नाही, अन् सापांपासून संरक्षण होतं. त्यामुळेच असं म्हटलं जातं, की जिथे साप येण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी कधीही थेट जमिनीवर झोपू नये, त्यासाठी बाजेसारख्या एखाद्या साधनाचा झोपण्यासाठी वापर करावा.