AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

K.K.Goswami : जिच्यासोबत माझं लग्न होणार होतं, ती माझ्या भावाची बायको बनली…प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितला प्रसंग, काय घडलेलं?

K.K.Goswami On His Marriage : प्रसिद्ध अभिनेते के. के. गोस्वामीनं एका मुलाखतीत त्याच्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे.

K.K.Goswami : जिच्यासोबत माझं लग्न होणार होतं, ती माझ्या भावाची बायको बनली...प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितला प्रसंग, काय घडलेलं?
| Updated on: Nov 16, 2026 | 7:50 PM
Share

मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. यापैकीच एक अभिनेता म्हणजे के.के. गोस्वामी. ‘शक्तिमान’, ‘विकराळ और गबराळ’, ‘शाका लाका बूम बूम’ आणि ‘गुटुर गू’ यांसारख्या मालिकांमधून त्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र, के.के. गोस्वामीचा यशस्वी कलाकार होण्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. कमी उंचीमुळे त्यांना आयुष्यात अनेकदा अपमान आणि नकाराचा सामना करावा लागला. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही याच कारणामुळे अनेक अडचणी आल्या. नुकत्याच सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्यानं आपल्या लग्नाशी संबंधित काही धक्कादायक आठवणी सांगितल्या आहेत.

अभिनेत्यानं सांगितला प्रसंग

अभिनेता म्हणाली की, ‘माझ्या वडिलांनी गावात माझ्या लग्नाबद्दल सांगितलं होतं. तेव्हा मी होकार दिला होता. लग्नाला फक्त दोन-तीन महिने उरले असताना, मला एका चित्रपटाची ऑफर आली. मी विचार केला की, मी नंतर लग्न करेन, पण मला पुन्हा चित्रपट मिळणार नाही. जेव्हा मी नकार दिला, तेव्हा मुलीचे कुटुंबीय संतापले. त्यांच्यात खूप भांडण झालं. ते म्हणाले की, त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी केली आहे. आता ते लोकांना काय उत्तर देणार?’ अभिनेत्यानं सांगितलं की, त्याच क्षणी त्याचा धाकटा भाऊ तिथे आला. भावाला पाहून मुलीचे वडील म्हणाले, ‘माझ्या मुलीचं लग्न या मुलाशी लावा. त्यामुळे ज्या मुलीसोबत माझं लग्न होणार होतं, ती माझ्या भावाची बायको बनली.’

के.के. गोस्वामी म्हणाला की, नंतर त्याला लग्न करण्याची इच्छा झाली, पण त्याला अशा मुलीसोबत लग्न करायचं होतं जी कुटुंबाची काळजी घेऊ शकेल. त्यामुळे त्याच्या बहिणीनं गावातील एका मुलीशी त्याचं लग्न ठरवलं होतं. पण लग्नाआधी त्याच्या सासरच्या मंडळींना त्याच्या कमी उंचीबद्दल माहिती नव्हती.

एक दिवस त्याच्या लहान भावानं फोन करून आईची तब्येत बिघडल्याचं सांगत त्याला गावाला बोलावून घेतलं. के.के. घरी पोहोचला तेव्हा तिथं लग्नाची तयारी आणि गाण्याचा कार्यक्रम सुरू होता. नेमकं काय सुरू आहे, असं त्यानं भावाला विचारलं असता, तुझंच लग्न ठरलं आहे, असं त्यानं सांगितलं. मात्र, लग्नासाठी गेल्यानंतर मुलीनं आपल्याला पाहून नकार दिला तर आपला खूप अपमान होईल, अशी भीती के.केच्या मनात होती. त्यामुळे त्यानं वडील आणि भावाला एक अट घातली. आपण वरात घेऊन मुलीच्या घरी जाणार नाही, तर मुलीकडच्यांनी तिला मंदिरात घेऊन यावं, असं त्यानं सांगितलं. मुलीनं लग्नास नकार दिला तर तिथूनच ट्रेन पकडून मुंबईला परत जायचं, असंही त्यानं मनाशी ठरवलं होतं.

के.के. गोस्वामी लग्नासाठी मंदिरात पोहोचला तेव्हा तिथं मोठी गर्दी जमली होती. कमी उंची असलेल्या तरुणाचं लग्न होत असल्याचं समजल्यानं अनेक लोक त्याला पाहण्यासाठी आले होते. हे पाहून पोलिसही तिथे दाखल झाले. मुलाची उंची कमी आणि मुलगी उंच असल्यानं काहीतरी गडबड असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे त्यांनी लग्न थांबवलं. यानंतर पोलिसांनी पुजारी आणि वकिलांना बोलावलं. लग्नासंबंधी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. तसेच के.केच्या पत्नीला तिच्या इच्छेविरुद्ध हे लग्न होत आहे का, अशी विचारणा करण्यात आली. तिनं स्वतःच्या इच्छेनं लग्न करत असल्याचं स्पष्ट केल्यानंतरच लग्न झालं.

Follow Us
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!