AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! जंतर मंतरवर मोठा गोंधळ, अभिजित दीपके यांच्यावर थेट…नेमकं काय घडलं?

आमचे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, असा दावा सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्याकडून केला जातोय. दरम्यान, आता आंदोलनस्थळी मोठ्या घडामोडी घडत आहेत. अभिजित दीपके यांच्यावर थेट शाईफेक झाल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! जंतर मंतरवर मोठा गोंधळ, अभिजित दीपके यांच्यावर थेट...नेमकं काय घडलं?
abhijeet dipkeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 18, 2026 | 4:24 PM
Share

CJP Abhijeet Dipke Protest : सध्या दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा 21 वा दिवस आहे. दरम्यान, 21 व्या दिवशी मात्र त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना एकीकडे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे आमचे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, असा दावा सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्याकडून केला जातोय. दरम्यान, आता आंदोलनस्थळी मोठ्या घडामोडी घडत आहेत. अभिजित दीपके यांच्यावर थेट शाईफेक झाल्याची माहिती समोर आली आहे.

महिलेने जवळ जाऊन केली शाईफेक

मिळालेल्या माहितीनुसार अभिजित दीपके यांच्यावर दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर भाषण करताना एका महिलेने शाईफेक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये अभिजित दीपके भाषण करताना दिसत आहेत. भाषण चालू असतानाच एक महिला त्याच्याजवळ गेल्याचे दिसत आहेत. जवळ जाऊन महिलेने अभिजित दीपके यांच्यावर शाईफेक केली आहे.

शाईफेकीची ही घटना घडताच काही काळासाठी जंतर मंतरवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दीपके यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. तर दुसरीकडे काही आंदोलनकर्त्यांनी संंबंधित महिलेला पकडून ठेवले. दरम्यान, संबंधित महिलेने दीपके यांच्यावर शाईफेक का केली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

आम्हाला मोदी यांचा राजीनामा हवा

दरम्यान, दुसरीकडे सोनम वांगचूक यांचीही प्रकृती खालावली आहे. त्यांना दिल्लीमधील सफदरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनम वांगचूक यांच्या शरीरातील पाण्याची पातळी खालावली आहे. परंतु त्यांनी उपचार घेण्यास मनाई केली आहे. त्यामुळे आता दिल्लीतील या आंदोलनाचे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पोलिसांकडून आमचे आंदोलन चिरडण्याचे काम केले जात आहे. पण आमचे हे आंदोलन संपणार नाही. ते चालूच असेल. आता आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही राजीनामा हवा आहे, अशी भूमिका अभिजित दीपके यांनी घेतली आहे.

Follow Us
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा