AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यवस्थेवरचा विश्वासच उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार; मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील एमएलसी निवडणुकीदरम्यान समाजवादी पक्षाचे उमेदवार आकाश अग्रवाल यांनी मतदान प्रक्रियेवर गंभीर आरोप केले. समर्थकांना त्रास दिला जात असल्याचा दावा करत त्यांनी धर्मांतर करण्याची घोषणा केली. नेमकं काय घडलं?

व्यवस्थेवरचा विश्वासच उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार; मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, नेमकं काय घडलं?
UP MLC Election 2026Image Credit source: social media
| Updated on: Oct 23, 2026 | 6:39 PM
Share

उत्तर प्रदेशमध्ये शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद निवडणुकीला रंग चढला आहे. या निवडणुकीमध्ये आता मोठा राजकीय संघर्ष् पाहायला मिळतो आहे. आग्रामधील ब्लॉक शिक्षक मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार हे कॅमेरासमोरच ढसाढसा रडले आहेत. आपण धर्मांतर करणार असल्याचा दावा करत त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी प्रशासकीय अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाला आपले धर्मांतर घडवून आणल्याचा आरोप केला आहे.

समाजवादी पक्षाचे उमेदवार आकाश आग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला की, प्रशानाने सत्ताधारी पक्षाच्या सांगण्यावरुन उघडपणे बूथवर ताबा मिळवला आहे. त्यांनी असाही दावा केला की खेरागढमधील बूथ क्रमांक २० वर उमेदवाराच्या भाच्याने पूर्णपणे ताबा मिळवला असून त्याने हा संपूर्ण बूथच लूटला आहे. यासंदर्भातील व्हिडिओही आपल्याकडे असल्याचा त्यांचा दावा असून हा व्हिडिओ आपण आयुक्तांना पाठवला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

एवढच नाही तर त्यांनी सांगितलं की याच मतदान केंद्रावर आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अधिकारी जेवायला गेल्यानंतर सर्व मतदारांना बाहेर काढण्यात आले आणि थेट कुलूप लावण्यात आले. या मतदान केंद्राशिवाय त्यांनी मतदान केंद्र क्रमांक ४० वरही बूथ कॅप्चर झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितलं की, माझा व्यवस्थेवरचा विश्वासच उडाला आहे. आपल्याबद्दल कोणीही काहीही अफवा पसरवतं, आरोप केले जातात. शिव्या दिल्या जातात. आम्ही काय पाकिस्तानातून आलो आहोत का? असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आपल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी सांगितलं की, मी पुढच्या महिन्यात लखनौला जाणार आहे. तिथं मी इस्लाम धर्माचा स्वीकार करणार आहे. कारण जिंकणे किंवा पराभूत होणे हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, पण मी एका स्वतंत्र भारतात राहतो आणि मला निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवायची आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार मला आहे. मला एका अधिकाऱ्याने सांगितले की तुम्ही फक्त एक उमेदवार आहात. तुम्ही कोणते देव (खुदा) नाहीत. मला आता सांगायचं आहे कीस मी माझा देव आता बदलला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या ११ जागांवर आज मतदान पार पडत आहे. यामध्ये पाच पदवीधर आणि सहा शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. लखनौ, वाराणसी, आग्रा, मेरठ आणि अलाहाबाद-झांसी या पदवीधर जागांचा समावेश आहे.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…