
नवी दिल्ली : 1948 ला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा श्रीलंका आर्थिक संकटाची झुंज देत आहे. श्रीलंकेतील राजपक्षे कुटुंबातील कित्तेक सदस्य सत्तेत राहिले. आता महिंदा राजपक्षेसह कुटुंबातील इतर सदस्यांनी राजीनामा दिला. गोटबाया राजपक्षे (Goybaya Rajapaksa) यांनी 13 जुलैला राजीनामा देणार असल्याचं सांगितलं. श्रीलंकेत राजपक्षे कुटुंबातील सदस्य एक-एक करून राजीनामा देत आहेत. सुरुवातीला 9 मे रोजी तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा (Resignation) दिला. त्यानंतर एका महिन्यानंतर 9 जूनला तत्कालीन वित्तमंत्री बासील राजपक्षे (Basil Rajapaksa) यांनी राजीनामा दिला. त्यानंतर एक महिन्यानी म्हणजे 9 जुलै रोजी आंदोलकांनी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या घरावर हल्ला केला. या सर्व घटनांचा विचार करता 9 नंबर आणि राजपक्षे कुटुंब यांचा काही संबंध आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.
श्रीलंकेच्या सत्तेत गेल्या दशकापासून राजपक्षे कुटुंब आहे. राजपक्षे कुटुंबातील तीन भाऊ काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेत सत्तेत होते. देशातील अर्थव्यवस्था खिळखिळी केल्याचा आरोप राजपक्षे कुटुंबावर लावला जात आहे. राजपक्षे कुटुंबात 1930 च्या दशकात डॉन डेवीड राजपक्षे सरपंच म्हणून निवडून आले. डेवीड राजपक्षे यांचा मुलगा डॉन मॅथ्यू राजपक्षे 1936 ला हंबनटोटो जिल्हा परिषदेत निवडून आला. डॉन मॅथ्यूच्या मृत्यूनंतर त्यांचा भाऊ डॉन एल्विन 1945 ला बिनविरोध निवडून आला.
महिंदा राजपक्षे 2005 ते 2015 पर्यंत राष्ट्रपती होते. 2015 ला मैत्रीपाला सिरिसेनाला हरवून पंतप्रधान झाले. महिंदा यांच्यावर गैरव्यवहाराचे अनेक आरोप झालेत. जनतेच्या पैशाचा वापर कुटुंबीयांच्या यात्रेसाठी केल्याचा आरोप श्रीलंकन वायूसेनेनं केलाय. 2015 मध्ये परदेश मंत्री मंगला समरवीरा यांनी राजपक्षे कुटुंबाची विदेशात 18 अरब डॉलर संपत्ती असल्याचा आरोप केला. त्यानंतर जनता रस्त्यावर उतरली. गोयबाया राजपक्षे हे महिंदा राजपक्षे यांचे लहान बंधू आहेत. ते सध्या श्रीलंकेचे राष्ट्रपती आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते सेनेत लेंफ्टनंट कर्नल होते. गोटबाया सुरक्षा सचिव असताना सैन्य खरेदीत 10 मिलीयन डॉलरचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. बासील राजपक्षे श्रीलंकेचे अर्थमंत्री होते. तेही महिंदा यांचे लहान भाऊ आहेत. बासील यांच्यावरही सरकारी संपत्तीचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. कमिशन घेत असल्यामुळं त्यांना मिस्टर 10 परसेंट म्हंटलं जातं.