AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्री लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू, 30 जखमी

Stampede at Goa temple: गोव्यात एका धार्मिक यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली. या अपघातात किमान ७ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झाले. जखमींना गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

श्री लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू, 30 जखमी
लैराई देवीचे मंदिर
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 03, 2025 | 8:12 AM
Share

Stampede at Goa temple: उत्तर गोव्यात एका धार्मिक यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली. या अपघातात किमान ७ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झाले आहेत. जखमींना गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. चेंगराचेंगरीची बातमी मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत रुग्णालयात पोहचले. त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करत पीडित कुटुंबांचे सांत्वन केले.

लैराई देवीचे मंदिर गोव्यात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. दक्षिण गोव्यातील शिरोडा गावात हे मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी यात्रा असते. त्यामध्ये 40 ते 50 हजार भाविक सहभागी होतात. शनिवारी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक पोहचले. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, एका ठिकाणी उतार असताना गर्दीतील लोक वेगाने चालू लागली. त्यामुळे गर्दीत गोंधळ निर्माण झाला. पळापळ सुरु झाली. त्यामुळे चेंगराचेंगरी सुरु झाली.

अग्नीवर चालण्याची परंपरा

दक्षिण गोव्यातील शिरोडा गावात लैराई देवीची विशेषतः पूजा केली जाते. हे स्थानिक लोकांसाठी आणि जवळच्या भागातील भाविकांसाठी एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र आहे. या ठिकाणी मंदिरामुळे दारू आणि अंडी देखील निषिद्ध आहेत. गावात कोणत्याही प्राण्याची हत्या करत येत नाही. या गावात घोडेही येऊ शकत नाहीत. लैराई देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक येतात.

लैराई देवी यात्रा गोव्यातील एक प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. ही यात्रा हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यात (मार्च-एप्रिल) होते. अनेक दिवस ही यात्रा चालते. या उत्सवातील सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अग्नीवर चालण्याची परंपरा आहे. ज्यामध्ये ‘धोंड’म्हटले जाणारे भक्त जळत्या अंगारांवर अनवाणी चालतात. हा विधी त्यांच्या श्रद्धेचे आणि आध्यात्मिक शुद्धतेचे प्रतीक आहे.

घटनेची माहिती मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रुग्णालयात पोहचले. उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय आणि बिचोलिम रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमींची भेट घेतली. त्यांच्या उपचारांबाबत निर्देश दिले. अधिकाऱ्यांना जखमींना सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...