AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लादेनच्या मृत्यूपेक्षाही भयंकर अ‍ॅक्शन…’, पाकिस्तानसाठी अमेरिकेचे भारताला खुले आव्हान

pahalgam terror attack: अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेम्स डेव्हिड व्हान्स यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचा प्लॅन तयार झाल्याचे म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, भारत आणि पाकिस्तान दरम्यान थेट युद्ध होऊ नये. अमेरिकेसह अनेक देशांची हीच भूमिका आहे.

'लादेनच्या मृत्यूपेक्षाही भयंकर अ‍ॅक्शन...', पाकिस्तानसाठी अमेरिकेचे भारताला खुले आव्हान
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेम्स डेव्हिड व्हान्स यांचे खळबळजनक वक्तव्यImage Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 02, 2025 | 12:53 PM
Share

pahalgam terror attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढला आहे. भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्या कारवाईची धास्ती पाकिस्तानी नेत्यांनी घेतली आहे. भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेम्स डेव्हिड व्हान्स यांचे खळबळजनक वक्तव्य समोर आले आहे. कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद्यांची साथ देणाऱ्यांना सोडण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. व्हान्स यांच्या वक्तव्यानंतर भारत मोठी कारवाई करणार असल्याचे संकेत मिळत आहे.

दहशतवाद्यांचा खात्मा करा…

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेम्स डेव्हिड व्हान्स यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचा प्लॅन तयार झाल्याचे म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, भारत आणि पाकिस्तान दरम्यान थेट युद्ध होऊ नये. अमेरिकेसह अनेक देशांची हीच भूमिका आहे. दहशतवादाविरोधात पाकिस्तानने भारताला मदत केली पाहिजे. तसेच पाकिस्तानात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा भारताने केला पाहिजे. ही कारवाई पाकिस्तानसाठी ओसामा बिन लादेन मारल्यापेक्षाही भयंकर असायला हवी.

व्हान्स यांच्या वक्तव्याचा अर्थ काय?

  • स्पेशल टीमने सिमीपलीकडे जाऊन टॉप टारगेट्सचा खात्मा केला पाहिजे. भारताच्या स्पेशल फोर्सकडे या पद्धतीची क्षमता आहे. हे ऑपरेशन पाकिस्तानला समजू न देता करता येईल.
  • भारताने इस्त्रायल, अमेरिकेप्रमाणे स्मार्ट ड्रोनने हल्ला केला पाहिजे. त्यामुळे दहशतवाद्यांचा खात्मा होऊ शकतो. त्याची जबाबदारी थेट भारताने घ्यावी. हे मिशन संवेदनशीलतेवर अवलंबून असणार आहे.
  • भारताने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी स्थानिक नेटवर्क किंवा पाकिस्तानात असलेल्या नेटवर्कचा वापर करावा. स्वत: जमिनीवरील युद्धपासून लांब राहून या पद्धतीने कारवाई करता येईल.
  • अत्याधुनिक ट्रॅकिंग, सोशल मीडिया, कॉल इंटरसेप्ट्सच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे लाईव्ह लोकेशन ट्रेस केले जावे. इस्त्रायलच्या पद्धतीने या माध्यमातून दहशतवाद्यांचा खात्मा करता येईल.
  • पाकिस्तानवर एकीकडे आंतरराष्ट्रीय दबाब आणावा आणि दुसरीकडे सर्जिकल स्ट्राईक केली जावी. त्याचे पुरावे मागे ठेऊ नये. परंतु परिणाम मोठा झाला पाहिजे.
Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत