Mohan Bhagwat : शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक, आतमध्ये होते सरसंघचालक मोहन भागवत
Mohan Bhagwat : सुरक्षाकारणांमुळे मोहन भागवत यांना ट्रेनमधून खाली उतरु दिलं नाही. आवश्यक चौकशी आणि औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ट्रेनला निर्धारित वेळेपेक्षा थोड्या उशिराने नवी दिल्लीसाठी रवाना केलं.

लखनऊ वरुन नवी दिल्लीला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसच्या एका कोचवर दगडफेक झाल्याची घटना समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवार संध्याकाळची आहे. खास बाब म्हणजे ज्या कोचची काच फुटली, त्या कोचमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत होते. या दगडफेकीच्या घटनेत दुसरे प्रवासी जखमी झालेले नाहीत. ट्रेन मक्खनपुर आणि फिरोजाबाद रेल्वे स्टेशन दरम्यान असताना, शताब्दी एक्सप्रेसवर बाहेरुन कोणीतरी दगडफेक केली. हा दगड एग्जीक्यूटिव क्लासच्या कोच ई-1 ला लागला. खिडकीची काच तुटली. ही घटना अचानक घडली. त्यामुळे ट्रेनमधील प्रवासी घाबरले.
मोहन भागवत त्याचं कोचमध्ये होते. पण ते खिडकीपासून लांब बसले होते. ते सुरक्षित आहेत. ट्रेन स्टाफने लगेच परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली. टूंडला जंक्शनवर रेल्वे सुरक्षा बल, राजकीय रेल्वे पोलीस आणि स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर होतं. ट्रेन स्टेशनवर पोहोचताच सुरक्षा बंदोबस्त अजून मजबूत करण्यात आला. अधिकाऱ्यांनी कोचच्या आत जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
#WATCH | Firozabad, Uttar Pradesh: Regarding the stone-pelting incident involving the Shatabdi Express,
DSP Aditya Langh says, At approximately 7:15 AM, near the border area of the South and Rasulpur police station jurisdictions, information was received that a train… https://t.co/3fhmNO9Bey pic.twitter.com/2303L1oOu5
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 11, 2026
प्रत्येक अँगलने चौकशी सुरु
सुरक्षाकारणांमुळे मोहन भागवत यांना ट्रेनमधून खाली उतरु दिलं नाही. आवश्यक चौकशी आणि औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ट्रेनला निर्धारित वेळेपेक्षा थोड्या उशिराने नवी दिल्लीसाठी रवाना केलं. या घटनेनंतर आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त टीम्सनी संबंधित रेल्वे स्थानकाच्या आसपास चौकशी सुरु केली आहे. आसपासच्या परिसरातील संशयास्पद हालचालींची माहिती गोळा केली जातेय.
रेल्वे ट्रॅकजवळच्या संभाव्य प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरु आहे. या घटनेची प्रत्येक अँगलने चौकशी सुरु असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं. दगडफेक करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी टेक्नोलॉजी आणि स्थानिक साक्षीदारांची मदत घेतली जात आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.