असं एक गाव, लोक प्रचंड श्रीमंत पण महिला, पुरुष कोणीच कपडे घालत नाहीत; कारण काय?
अनेक गावाच्या आपल्या वेगवेगळ्या प्रथा पंरपरा असतात. त्या प्रथा परंपरेच ते पालन करतता. असं एक गाव आहे, ज्या गावात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत महिला पुरुष कोणीच कपडे घालत नाहीत.

जगभरात आणि भारतामध्ये देखील अशी अनेक गावं आहेत, ज्यांची ओळख ही तेथील विशिष्ट प्रथा परंपरेमुळे तयार झालेली असते. अशी गावं काहीही झालं तरी आपल्या प्रथा पंरपरांचं काटेकोरपणे पालन करतातच. अशा अनेक प्रथा आहेत, भारताबाबत बोलायचं झाल्यास हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातल्या पिणी गावात एक विचित्र प्रथेचं पालन केलं जात. या गावात पाच दिवसांचा एक उत्सव असतो, या उत्सवाच्या काळात येथील महिला कपडेच घालत नाहीत. तसेच या काळात पुरुषांना गावात एन्ट्री नसते. जर या प्रथेचं पालन केलं नाही तर गावावर मोठं संकट येऊ शकतं, अशी या प्रथे मागची धारणा आहे. समाज हा शेकडो वर्षांपासून वेगवेगळ्या प्रथांचं पालन करत आला आहे. प्रत्येक परंपरांमागे काही न काही कारण असतं. यातील अनेक प्रथा या निसर्गाशी जोडल्या गेलेल्या असतात. निसर्गाचे मानवावर अनंत उपकार आहेत, त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या प्रथांचं पालन केलं जातं.दरम्यान एक गाव आपल्या अनोख्या प्रथेमुळे चांगलंच चर्चेत आलं आहे.
तुम्ही कधी अशा गावाबद्दल ऐकलं आहे का, तेथील लोक बाराही महिने कपडेच घातल नाहीत, फक्त पुरुषच नाही तर महिला देखील कधीच कपडे घालत नाहीत. हे ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो. मात्र जगाच्या पाठीवर असं देखील एक गाव आहे, ज्या गावातील लोक कपडेच घातल नाहीत. आता तुम्ही म्हणाल की ते गरीब असल्यामुळे कपडे घालत नसतील, तर तसं देखील नाहीये, येथील लोक प्रचंड श्रीमंत आहेत. प्रत्येकाकडे दोन मजल्यांची टुमदार घरं आहेत. मात्र तरी देखील आपलं निसर्गासोबत असणारं नात दाखवण्यासाठी येथील स्त्री पुरुष आपल्या अंगात आयुष्यात कधीच कपडे घालत नाहीत.
हे गाव हर्टफोर्डशायरमध्ये असून स्पीलप्लाट्स असं या गावाचं नाव आहे, समोर आलेल्या माहितीनुसार 90 वर्षांपासून या गावात ही प्रथा सुरू झाली, आपलं निसर्गासोबत असणारं नात जपण्यासाठी या गावातील लोकांनी ही प्रथा सुरू केली. हे गाव पहाण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. मात्र पर्यटकांना देखील कपडे घालून आत प्रवेश दिला जात नाही, त्यांना देखील आपले कपडे काढावे लागतात, तेव्हाच गावामध्ये प्रवेश मिळतो. मात्र येथील लोक जेव्हा गावाच्या बाहेर पडतात तेव्हा मात्र ते कपडे घालूनच बाहेर पडतात.
