उमर अब्दुला आणि पायल यांच्या तलाकला सुप्रीम कोर्टाची मंजूरी, १७ वर्षांपासून स्वतंत्र रहात होते दाम्पत्य…

जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुला आणि त्यांच्यापासून विभक्त झालेली त्यांची पत्नी पायल अब्दुल्ला यांचे १७ वर्षांचे वैवाहिक नाते अखेर समाप्त होत आहे. दोन्ही पक्षांनी परस्पर सहमतीने तलाक घेण्यासाठी एकमेकांविरोधात दाखल केलेला दीर्घ खटला मागे घेतला आहे. सुप्रीम कोर्टाला याबद्दलची माहिती दिल्यानंतर आता कोर्टाबाहेर या प्रकरणाचा निपटारा होणार आहे.

उमर अब्दुला आणि पायल यांच्या तलाकला सुप्रीम कोर्टाची मंजूरी, १७ वर्षांपासून स्वतंत्र रहात होते दाम्पत्य...
Omar Abdullah and Payal
| Updated on: Jul 31, 2026 | 5:09 PM

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि त्यांच्यापासून वेगळी रहात असलेली त्यांची पत्नी पायल अब्दुल्ला यांचे १७ वर्षांचे वैवाहिक जीवनाचे नाते आता कायदेशीररित्या संपणार आहे. दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने तलाक घेण्यासाठी एकमेकांविरोधात दाखल केलेला खटला मागे घेण्याची माहिती कोर्टात दिली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात कोर्टाबाहेर तोडगा निघणार आहे. सुप्रीम कोर्टाने या संदर्भात निपटारा करण्याचे संकेत दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचे प्रतिनिधीत्व करणारे वरिष्ठ अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी कोर्टाला अवगत केले की दोन्ही पक्षानी परस्पर सहमतीने या प्रकरणावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

वरिष्ठ वकीलांनी कोर्टाला सांगितले की दोन्ही पक्षांनी स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्ष परस्पर सहमतीने विवाहाचे नाते समाप्त करण्यासाठी घटनेच्या कलम १४२ च्या वापर करीत २२ जुलै रोजी याचिका केली होती. यावर न्यायमूर्ती नरसिंह यांनी म्हटले की कोर्ट आता सांमजस्याच्या अटींनुसार उचित आदेश जारी करुन या प्रकरणाचे निपटारा करणार आहे.

१९९४ रोजी झाला होता विवाह, २०११ पासून वेगळे झाले

उमर अब्दु्ल्ला आणि पायल यांची भेट दिल्लीच्या ओबेरॉय हॉटलात काम करताना झाली होती. त्यानंतर दोघांनी १९९४ मध्ये विवाह केला होता. या लग्नातून त्यांना दोन मुले जाहिर आणि जमीर झाली. मात्र, २००९ पासून दोघांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. साल २०११ मध्ये उमर अब्दुल्ला यांनी सार्वजनिक रुपाने १७ वर्षांच्या जुन्या वैवाहिक नात्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us