AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रीम कोर्टात कागद फेकणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही; सरन्यायाधीशांचा मोठा निर्णय, कारण काय?

supreme court News : सुप्रीम कोर्टात कागद फेकणाऱ्यावर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सरन्यायाधीशांनी हा निर्णय घेतलाय.

सुप्रीम कोर्टात कागद फेकणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही; सरन्यायाधीशांचा मोठा निर्णय, कारण काय?
| Updated on: Jul 12, 2026 | 7:53 AM
Share

सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांवर कागद फेकणे आणि शिवीगाळ करणार्‍यांवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. न्यायाधीश केवी विश्वनाथन आणि न्यायाधीश आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर एका याचिकाकर्त्याने कागद फेकले होते. या प्रकारानंतर त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन कोर्टरुमच्या बाहेर नेले होते. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारने याचिकाकर्त्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. परंतु त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे की, आता प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा घटनेचा अवलंब केला जात आहे. त्याच्याविरोधात कारवाई केल्यास त्याचा हेतू पूर्ण होईल. रजिस्ट्रारने सरन्यायाधीशांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यावेळी त्यांनी कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सुप्रीम कोर्टात शुक्रवारी सुनावणीदरम्यान एकाने कोर्टरुममध्ये (Court) राडा केला. एकाने कोर्टात न्यायाधीशांना शिवीगाळ करून कोर्टरुमध्ये केसची फाइल फेकली. या घटनेदरम्यान सरन्यायाधीश सूर्य कांत कोर्टरुममध्ये उपस्थित नव्हते. ही सुनावणी न्यायाधीश के. व्ही. विश्वनाथन, न्यायाधीश आलोक अराधने यांच्या खंडपीठासमोर सुरू होती. याचिकाकर्ता हा कोणत्याही वकिलाशिवाय स्वत:ची बाजू मांडत होता. सुनावणीदरम्यान त्याने रागाच्या भरात हातातील कागदपत्रे न्यायाधीशांवर फेकली. याचिकाकर्त्याच्या कृत्याने कोर्टात एकच शांतता पसरली. परंतु पुढील क्षणात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कोर्टाबाहेर नेलं.

कोर्टात नेमकं काय घडलं?

सुनावणीदरम्यान याचिकाकर्ता म्हणाला, ‘न्यायाधीश, मी तुम्हाला लखनौच्या एसपीविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश देतो’. याचिकाकर्त्याच्या विधानावर न्यायाधीश के व्ही. विश्वनाथन यांनी आश्चर्य व्यक्त केलं. नंतर त्यांनी म्हटलं की, ‘तुम्ही मला आदेश देताहेत का?’ याचिकाकर्ता पुढे म्हणाला, ‘माझ्या बाजूने एवढेच आहे. सर्व काही रेकॉर्ड आहे’. त्यानंतर हवेत फाइल फेकली. त्यानंतर याचिकाकर्ता शिवीगाळ करू लागला. कोर्टात उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने कोर्टाबाहेर काढलं. त्याच्या कृत्याची क्षणात देशभरात चर्चा झाली. त्याच्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडियावरही या याचिकाकर्त्यावर जोरदार टीका झाली.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला