AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SC Gyanesh Kumar : मोठी बातमी, ज्ञानेश कुमार विरोधातील याचिकांची दखल घेत सुप्रीम कोर्टाने उचललं महत्वाचं पाऊल

Supreme Court Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकांवर आज मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

SC Gyanesh Kumar : मोठी बातमी, ज्ञानेश कुमार विरोधातील याचिकांची दखल घेत सुप्रीम कोर्टाने उचललं महत्वाचं पाऊल
Supreme court Gyanesh Kumar
| Updated on: Oct 05, 2026 | 1:31 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकांवर आज मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. वरिष्ठ वकिल विकास सिंह यांनी कोर्टात बाजू मांडताना जोरदार युक्तीवाद केला. कुठल्याही संवैधानिक प्राधिकरणपेक्षा सध्या मुख्य निवडणूक आयुक्त बलवान आहेत असं ते म्हणाले. 1990 साली असं नव्हतं. 2023 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांना बलवान बनवण्यात आलं. आज प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तामुळे असुरक्षिततेची भावना आहे असं विकास सिंह म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या युक्तीवादाची व ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दाखल झालेल्या याचिकांची दखल घेतली.

सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला नोटीस जारी करण्यात आली आहे. जस्टीस बागची म्हणाले की, आम्हाला निवडणूक आयोगाची बाजू सुद्धा ऐकावी लागेल. दरम्यान सुप्रीम कोर्टाने अंतरिम आदेश द्यायला नकार दिला आहे. सुनावणी दरम्यान वरिष्ठ वकिल विकास सिंह म्हणाले की, न्यायाधीश निवडणूक आयोगाचा निर्णय बदलू शकत नाही.

कोर्टात सुनावणीत काय घडलं?

वरिष्ठ वकिल विकस सिंह : ज्ञानेश कुमार यांना तात्काळ निलंबित करण्याची गरज. देशात बरेच लोक त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी मनमानी पद्धतीने निर्णय घेतले हे आता समोर आलय. त्यांच्याकडे अशी सुरक्षा आहे, जी पीएम पेक्षा पण जास्त आहे.

जस्टिस जे बागची : त्यांना हटवलं तर निवडणुका कोण घेणार?

विकास सिंह : त्यावर विकास सिंह म्हणाले की, दोन निवडणूक आयुक्त आहेत. ते निवडणुका घेऊ शकतात. तुम्ही त्यांना हटवलं नाही, तर तुम्ही समजून घ्या त्यांनी घेतलेल्या निवडणुका तुम्ही बदलू शकत नाही.

विकास सिंह- तुम्ही हे म्हणू शकता की, निवडणूक आयुक्तांनी सर्व सम्मतीने निर्णय घ्यावेत. कारण हे आवश्यक सुद्धा आहे

सीजेआय सूर्यकांत- ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे. निर्णय सर्वसम्मतीने होत नसतील तर ते बहुमताच्या आधारावर होणं गरजेचं आहे. हा नियम सुद्धा आहे.

सीजेआय सूर्यकांत : तुम्ही एका न्यूज पेपरचा हवाला देऊन आपलं म्हणणं मांडताय

विकास सिंह : निवडणूक आयोगाने प्रेस रिलीजमध्ये आरोप फेटाळलेले नाहीत. हे खूप अस्पष्ट आहे.

सीजेआय सूर्यकांत : वर्तमानपत्राची बातमी एकतर योग्य आहे किंवा आंशिक योग्य आहे.

विकास सिंह : हे तुम्ही ठरवा. कायद्याचं कोणतही उल्लंघन नाही झालं पाहिजे. हे आवश्यक आहे.

Follow Us
लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
Chitra Wagh vs Rohit Pawar : लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती