आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

आंदोलकांवरील पोलीस कारवाईवर तातडीची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून, सरन्यायाधीश म्हणाले, "व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही."

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार
CJP Protest
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 22, 2026 | 11:51 AM

जंतर-मंतर येथे सुरु असलेल्या आंदोलनाने एक वेगळे वळण घेतवे आहे. येथील आंदोलकांवरील कथित पोलीस कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. याचिकाकर्त्याच्या वकिलाने न्यायालयाला व्हिडीओ पाहून स्वतःहून दखल घेण्याची विनंती केली, परंतु सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले की, व्हिडीओ पाहण्यासाठी न्यायालयाकडे वेळ नाही.

नेमकं कोर्टात काय घडलं?

सुप्रीम कोर्टाने आदोलकांवर झालेल्या पोलिस कारवाईशी संबंधित एक तातडीची याचिका ऐकण्यास नकार दिला आहे. याचिका दाखल करणाऱ्या वकिलाने कोर्टाला विनंती केली होती की, पोलिसांच्या हल्ल्याचे व्हिडीओ पाहावे आणि प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी. मात्र, भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोर्टाकडे व्हिडीओ पाहण्यासाठी वेळ नाही. पुढे त्यांनी वकिलाला सांगितले की, कोर्टाचा वेळ वाया घालवू नका आणि आपला वेळही वाया घालवू नका.

हा प्रकार त्या वेळी समोर आला जेव्हा एका वकिलाने सुप्रीम कोर्टात आंदोलकांवर झालेल्या पोलिस कारवाईचा उल्लेख केला. वकिलाने कोर्टाला सांगितले की, पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली असून याचे अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत. त्यांनी न्यायाधीशांना विनंती केली की, त्यांनी स्वतः ते व्हिडीओ पाहावे आणि प्रकरणात स्वत: दखल घ्यावी. मात्र, मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी वकिलाचे बोलणे मध्येच थांबवली. त्यांनी स्पष्ट केले की, कोर्टाला इतका वेळ नाही.

“आमच्याकडे व्हिडीओ पाहण्यासाठी वेळ नाही”

सीजेआयने वकिलाला सरळ शब्दांत सांगितले, “आमच्याकडे व्हिडीओ पाहण्यासाठी वेळ नाही.” यानंतर त्यांनी हेही पुढे जोडले की, वकीलांनी ना कोर्टाचा वेळ वाया घालवावा आणि ना स्वतःचा वेळ वाया घालवावा. वकिलाने आपली बाजू मांडताना सांगितले की, आंदोलन करणारे विद्यार्थी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत आहेत. यामध्ये नीट परीक्षेचे योग्यरित्या आयोजन करणे आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मध्ये सुधारणा करण्यासारखे मुद्दे समाविष्ट आहेत. विद्यार्थ्यांची मागणी आहे की, परीक्षा पद्धतीत सुधारणा करावी जेणेकरून भविष्यात अशा गडबडी होणार नाहीत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us