AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manipur Viral Video : मे महिन्यापासून आतापर्यंत कारवाई का नाही?; मणिपूरमधील ‘त्या’ व्हिडीओवरून सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल

मणिपूरमध्ये 4 मे रोजी मैतेई समुदायातील शेकडो लोक कांगकोपकी जिल्ह्यातील केबी फाईनोम गावात शिरले होते. या लोकांच्या हातात शस्त्र होती. त्यांनी गावात शिरताच जाळपोळ सुरू केली.

Manipur Viral Video : मे महिन्यापासून आतापर्यंत कारवाई का नाही?; मणिपूरमधील 'त्या' व्हिडीओवरून सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल
supreme court Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 20, 2023 | 2:15 PM
Share

नवी दिल्ली | 20 जुलै 2023 : मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची नग्न धिंड काढण्यात आली. त्यानंतर या महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गंभीर दखल घेतली असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तर, सर्वोच्च न्यायालयानेही या घटनेवरून संताप व्यक्त केला असून केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी कठोर शब्दात या घटनेची निर्भत्सना केली आहे. अशा घटना खपवून घेता येणार नाही. व्हायरल झालेला व्हिडीओ चिंताजनक आहे. या प्रकरणी मे महिन्यातच कारवाई करायला हवी होती. या मुद्द्याकडे डोळेझाक करून चालणार नाही, असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

आम्ही डिस्टर्ब आहोत

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मीडियात जे दाखवण्यात आलं आहे, त्यामुळे आम्ही डिस्टर्ब झालो आहोत. मानवी हक्क आणि महिलांच्या अधिकारांचं हे सर्रासपणे झालेलं उल्लंघन आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे आम्ही आदेश देत आहोत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

कदापि सहन करणार नाही

सर्वोच्च न्यायालय आता या प्रकरणी येत्या 28 जुलै रोजी सुनावणी करणार आहे. यावेळी मणिपूर सरकार आणि केंद्र सरकारने काय कारवाई केली याची माहिती घेतली जाणार आहे. लोकशाही देशात अशा प्रकारच्या घटना कदापि सहन केल्या जाणार नाही. अशा प्रकारच्या घटना मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. हे संविधानाच्या अधिकाराचं उल्लंघन आहे, असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संतप्त

दरम्यान, या घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा संतप्त झाले आहेत. मणिपूरच्या घटनेचा व्हिडीओ पाहून माझ्या मनात चीड निर्माण झाली आहे. मला प्रचंड राग आला आहे. त्या दोन महिलांबाबत जे काही घडलंय त्यामुळे देशाची मान खाली गेली आहे. अशा घटनांमुळे जगभरात देशाची बदनामी होत असते. ज्यांनी कोणी हे कृत्य केलं असेल त्या कुणालाही सोडणार नाही. प्रत्येकाला कठोर शिक्षा केली जाईल, असा सज्जड इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

नेमकं काय घडलं?

मणिपूरमध्ये 4 मे रोजी मैतेई समुदायातील शेकडो लोक कांगकोपकी जिल्ह्यातील केबी फाईनोम गावात शिरले होते. या लोकांच्या हातात शस्त्र होती. त्यांनी गावात शिरताच जाळपोळ सुरू केली. हंगामा सुरू केला. त्यामुळे गावकरी जीव वाचवण्यासाठी पळून गेले. त्यापैकी तीन महिलाही जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेने पळाल्या. त्यापैकी दोन महिलाांना काही नराधमांनी घेरलं. त्यांनी या महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली. त्यानंतर त्यांना शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...