सुरत कोचिंग क्लास आग : 23 विद्यार्थ्यांचा मृत्यू, संचालकाला बेड्या

गांधीनगर : गुजरातमधील सुरतच्या चार मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीतील मृतांची संख्या 23 वर पोहोचली आहे.  त्यू झालेले सर्व विद्यार्थी आहेत. कोचिंग क्लास सुरु असलेल्या  तक्षशिला आर्केड या इमारतीत शुक्रवारी हे भीषण अग्नीतांडव पाहायला मिळालं. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही भीषण आग लागली. या इमारतीत चौथ्या मजल्यावर एक कोचिंग क्लास घेण्यात येत […]

सुरत कोचिंग क्लास आग : 23 विद्यार्थ्यांचा मृत्यू, संचालकाला बेड्या
Follow us
| Updated on: May 25, 2019 | 10:09 AM

गांधीनगर : गुजरातमधील सुरतच्या चार मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीतील मृतांची संख्या 23 वर पोहोचली आहे.  त्यू झालेले सर्व विद्यार्थी आहेत. कोचिंग क्लास सुरु असलेल्या  तक्षशिला आर्केड या इमारतीत शुक्रवारी हे भीषण अग्नीतांडव पाहायला मिळालं. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही भीषण आग लागली. या इमारतीत चौथ्या मजल्यावर एक कोचिंग क्लास घेण्यात येत होता. याच कोचिंग क्लासमध्ये ही आग लागली. या आगीप्रकरणी आता क्लासच्या संचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

आग लागली तेव्हाही हा क्लास सुरु होता. आग लागल्यानंतर क्लासमध्ये एकच गोंधळ उडाला. बाहेर निघायला कुठलाही मार्ग नसल्याने जीव वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी चक्क चौथ्या मजल्यावरुन खाली उड्या घेतल्या.   या इमारतीत 40 जण अडकलेले असल्याची माहिती होती.

या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अग्नीशमन दलाच्या गाड्या आग लागलेल्या मजल्यापर्यंत पोहोचू शकत नसल्याने या विद्यार्थ्यांनी थेट खाली उड्या घेतल्या. अग्नीशमन दलासमोरच हा मृत्यूचा तांडव सुरु होता, मात्र अग्नीशमन दल या विद्यार्थ्यांना वाचवण्यात अपयशी ठरलं.

तक्षशिला आर्केड ही इमारत एक व्यावसायिक इमारत आहे. व्यावसायिक इमारतीत कोचिंग क्लास घेण्याची परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. त्यासोबतच जेव्हा या इमारतीचं ऑडीट करण्यात आलं तेव्हा इथे अशा आप्तकालीन परिस्थितीत बाहेर निघण्यासाठी कुठला पर्याय आहे की नाही, याची तपासणी का केली गेली नाही, असे प्रश्न आता नागरिग उपस्थित करत आहेत. सुरत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इतकी मोठी दुर्घटना घडल्याचा आरोप आता स्थानिकांनी केला.

या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुख: व्यक्त केलं. मोदींनी गुजरात सरकारला पीडितांना तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

पाहा लाईव्ह : 

https://www.youtube.com/watch?v=MJI59_HUUuc

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.