सुsssपर! रोज 1 रुपया वाचवला, 3 वर्षांनी 2.6 लाखाची Dream Bike घेतली! Tamilnaduच्या पोराची कमाल! 

| Updated on: Mar 29, 2022 | 4:51 PM

Tamilnadu one rupee bike : एक रुपया दररोज वाचवून एका मुलानं त्याच्या स्वप्नातली बाईक खरेदी केली. तीन वर्ष दररोज एक रुपया सेव्ह केला होता. आणि तीन वर्षांना एक एक रुपयाची चिल्लर घेऊन शोरुममध्ये पोहोचला.

सुsssपर! रोज 1 रुपया वाचवला, 3 वर्षांनी 2.6 लाखाची Dream Bike घेतली! Tamilnaduच्या पोराची कमाल! 
एक रुपयाची बचत आणि लाखो रुपयांची बाईक खरेदी
Image Credit source: ANI
Follow us on

एक रुपयाची (Tamilnadu one rupee saving) कुणी बचत करतं का, हल्लीच्या काळात? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. पण एक-एक रुपया जोडून लाखो रुपयांची सुपरबाईक (Dream bike worth Rs 2.6 Lakh) खरेदी करण्याची किमया एका तरुणानं करुन दाखवली आहे. तामिळनाडूतल्या (Tamilnadu) या मुलानं कमालच केली. एक रुपया दररोज वाचवून तरुणानं त्याच्या स्वप्नातली बाईक खरेदी केली. तीन वर्ष दररोज एक रुपया सेव्ह केला होता. आणि 3 वर्षांनी एक एक रुपयाची चिल्लर घेऊन हा मुलगा थेट अडीच लाखापेक्षा जास्त किंमतीची सुपरबाईक घेण्यासाठी शो रुममध्ये पोहोचला. या पोरानं खरेदीसाठी आणलेली चिल्लर पाहून शोरुममधील लोकंही चक्रावून गेले. अखेर या मुलानं आणलेली चिल्लर शोरुमधील लोकांनी मोजली. 10 तास चिल्लर मोजून झाल्यानंतर या तरुणाला आपली ड्रीम बाईक खरेदी करता आली. बजाज डोमिनार 400 ही सुपरबाईक या मुलानं खरेदी केली. या बाईकची किंमत सुमारे 2 लाख 60 इतकी आहे.

चिल्लर पाहून कर्मचारी हैराण!

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार या तरुणाचं नाव व्ही भूपथी असं आहे. या तरुणानं तामिळनाडूच्या सालेम इथल्या शो रुममध्ये शनिवारी हजेरी लावली. तीन वर्ष केलेली एक एक रुपयांची बचत केलेली रक्कम घेऊन हा मुलगा बजाजच्या शोरुममध्ये पोहोचला. या शोरुमध्ये आल्यानंतर त्यानं आपल्यासोबत आलेली रक्कम शो रुपमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना दिली. यानंतर व्ही भूपथीनं आणलेली रक्कम मोजण्यातच तब्बल दहा तासांची कसरत शो रुममधील कर्मचाऱ्यांना करावी लागली.

दहा तासांच्या चिल्लर मोजणीनंतर अखेर बजाजची 2 लाख 60 हजार रुपयांची बाईक या तरुणानं खरेदी केली. सुरुवातील खरंतर शोरुमचा मॅनेजर इतकी प्रचंड चिल्लर पाहून थक्क झाला होता. पण आपल्याकडे आलेल्या ग्राहकाला नाराज न करण्याच्या हेतून अखेर ही चिल्लर मोजून लाखमोलाची बाईक खरेदी करण्याचा या तरुणाचा प्रयत्नही यशस्वी झाला आहे.

कोण आहे हा तरुण?

व्ही भूपती हा एक युट्युबर आहे. त्यानं तीन वर्षांपूर्वी बाईक खरेदीचं स्वप्न पाहिल होतं. तीन वर्षांपूर्वी ही बाईक खरेदी करणं शक्य नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. यानंतर त्यानं दर दिवशी एक एक रुपया जोडला. तीन वर्ष सेव्हिंग केली. यानंतर यूट्यूबमधूनही व्ही भूपतीनं चांगली कमाई केली. या कमाईतूनच अखेर या युट्युबर तरुणाला आपलं स्वप्न साकारण्यात यश आलंय.

एकीकडे चिल्लरची मोजणी, दुसरीकडे स्वप्नपूर्ती

इतर प्रेरणादायी बातम्या :

दोन युवा शेतकऱ्यांची प्रेरणादायी कहाणी, माळरानावर बहरली स्ट्रॉबेरी

कोरडवाहू जमिनीवर द्राक्षाची बाग, ध्येयवेड्या उमेशची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी

पाहा पेट्रोल डिझेलची महत्त्वाची बातमी :