AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story : कोरडवाहू जमिनीवर द्राक्षाची बाग, ध्येयवेड्या उमेशची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी

शेती पध्दतीमध्ये बदल करायचा म्हणलं की, भौगोलिक स्थिती, वातावरणातील बदल आणि उत्पादनावर वाढत असलेला खर्च याचा विचार केला जातो. पण पक्का निर्धार आणि कष्ट करण्याची तयारी असल्यावर डोंगराळ भागातही द्राक्षाची बाग कशी बहरावी याचे उत्तम उदाहरण जिल्ह्यातील राळेगाव येथील तरुण शेतकरी उमेश झाडे याने महाराष्ट्रासमोर ठेवले आहे.

Success Story : कोरडवाहू जमिनीवर द्राक्षाची बाग, ध्येयवेड्या उमेशची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी
यवतमाळ जिल्ह्यातील कोरडवाहू क्षेत्रावर तरुण शेतकऱ्याने द्राक्षाची बाग फुलवली आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Feb 21, 2022 | 1:03 PM
Share

यवतमाळ : शेती पध्दतीमध्ये बदल करायचा म्हणलं की, भौगोलिक स्थिती, वातावरणातील बदल आणि उत्पादनावर वाढत असलेला खर्च याचा विचार केला जातो. पण पक्का निर्धार आणि कष्ट करण्याची तयारी असल्यावर डोंगराळ भागातही द्राक्षाची बाग कशी बहरावी याचे उत्तम उदाहरण जिल्ह्यातील राळेगाव येथील तरुण शेतकरी उमेश झाडे याने महाराष्ट्रासमोर ठेवले आहे. (Dry Land) कोरडवाहू जमिन आणि प्रतिकूल वातावरणात (Grape Production) द्राक्ष लागवड केल्यावर अनेकांनी उमेशला हिनवले होते. मात्र, घेतलेला निर्णय प्रत्यक्षात उतरवण्यासाठी उमेशने रात्रीचा दिवस केला. आज वर्षाभराच्या कालावधीत अनेक संकटावर मात करुन त्याने उभारलेली बाग पाहून हिणवणाऱ्यांची बोटे तोंडात गेल्याशिवाय राहणार नाहीत. राळेगावच्या शिवारात त्याने सव्वा एकरामध्ये ही (Vineyard) द्राक्षाची बाग बहली आहे. यंदा पहिले वर्ष असल्याने केलेला खर्च पदरी पडणार नाही पण आगामी काळात विक्रमी उत्पादन घेणार हा उमेशचा आत्मविश्वास सर्व शेतकऱ्यांसाठी प्ररेणादायी ठरणार आहे.

कशी झाली सुरवात?

उमेश राळेगाव तालुक्यातील वाढोणाबाजार येथील रहिवासी आहे.आठ एकर शेती अन् पारंपरिक शेतीतून कापूस व सोयाबीन पीक तो घेत होता. उत्पन्नाच्या तुलनेत बाजारपेठेत मालाला भाव मिळत नसल्याने शेती तोट्याची ठरत होती. तोट्यात असलेल्या शेतीला नफ्यात आणण्यासाठी उमेश याने द्राक्ष शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने पंढरपूर जवळील कासेगाव येथून कलमा आणल्या. 1 डिसेंम्बर 2020 ला सव्वा एकरात पंधराशे कलमांची 8 बाय 4 वर लागवड केली. तीन महिन्यानंतर त्याची रीकट केली. ड्रीपमधून खते व पाणीही देण्याचे नियोजन त्याने केले होते. योग्य नियोजनाला कष्टाची जोड मिळाल्याने ही बाग बहरली आहे.

कापूस पट्ट्यात बहरली द्राक्षाची बाग

जिल्ह्यात सर्वाधिक कापूस व सोयाबीन हे पारंपरिक पिके घेतल्या जाते.शिवाय पाण्याची सोय नसल्याने शेतकरी पारंपरिक पिकावरच भर देतात. वाढोनाबाजार येथील उमेश झाडे या युवा शेतकऱ्यांने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्याप्रमाने द्राक्ष या फळ पिकाची लागवड केली आहे. यावर्षी पहिलेच वर्ष असून दीड एकरात द्राक्षाही लागले आहे. हा यवतमाळ जिल्यातील कोरडवाहू शेतीत त्याने यशस्वी अभिनव प्रयोग केला. यवतमाळ जिल्हा कापसासाठी जसा प्रसिद्घ आहे. तसाच तो नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणार्‍या आत्महत्यांनी काळवंडला आहे. या जिल्ह्यातील एका बहाद्दर शेतकर्‍याने पारंपरिक शेतीला फाटा देत चक्क नाशीकप्रमाणेच द्राक्षशेती फुलविली आहे.

पीक पध्दतीमध्ये बदल करण्याची हीच योग्य वेळ

एकट्या उमेशमुळे आता या परिसरातील शेतकरी पीक पध्दतीमध्ये बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. पाण्याची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी फळबागेकडे वळावे संत्रा मोसंबी आणि आता द्राक्ष ही या वातावरणात येत असल्याने या पिकाची लागवड करावी यातून कमी विक्रम मध्ये जास्त आर्थिक उत्पन्न या फळबागेतून मिळतं त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी द्राक्ष शेती व इतर फळबागांची लागवड करणे गरजेचे आहे. काळाच्या ओघात बदलण्याची आणि शेती उत्पन्न वाढवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

पांढरे सोने तेजीतच राहणार, शेतकऱ्यांचा ‘तो’ निर्णय आजही फायदेशीर..! वाचा सविस्तर

Summer Onion : वाढीव कांदा उत्पादनाचे करायचे काय? सरकारच्या धोरणावरच कांदा दराचे भवितव्य..!

ज्याच्यावर सारा पैसा लावला, ते पिक घटलं, वरखर्च देणारा भाजीपालाही कवडीमोलाचा, सांगा शेती करायची कशी ?

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?