पांढरे सोने तेजीतच राहणार, शेतकऱ्यांचा ‘तो’ निर्णय आजही फायदेशीर..! वाचा सविस्तर

कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी या पिकाचा बाजारपेठेत तोरा कायम आहे. सरकीच्या दरातील चढ-उताराचा परिणाम कापसावरही होत असला तरी ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली आहे त्याचे सोनेच होणार असल्याचे संकेत कृषितज्ञ देत आहेत. या आठवड्यात सरकीच्या दरात वाढ होताच कापूसही वधारला आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाचे दर हे 10 हजारवर स्थिरावले असले तरी भविष्यात कापसाला 13 हजार रुपये क्विंटलचा दर मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पांढरे सोने तेजीतच राहणार, शेतकऱ्यांचा 'तो' निर्णय आजही फायदेशीर..! वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 12:19 PM

पुणे : कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी या पिकाचा बाजारपेठेत तोरा कायम आहे. सरकीच्या दरातील चढ-उताराचा परिणाम (Cotton Rate) कापसावरही होत असला तरी ज्या शेतकऱ्यांनी (Cotton Stock) कांद्याची साठवणूक केली आहे त्याचे सोनेच होणार असल्याचे संकेत कृषितज्ञ देत आहेत. या आठवड्यात सरकीच्या दरात वाढ होताच कापूसही वधारला आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाचे दर हे 10 हजारवर स्थिरावले असले तरी भविष्यात कापसाला 13 हजार रुपये क्विंटलचा दर मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. फेब्रुवारीच्या शेवटी (Cotton Production) कापूस उत्पादन किती झाले याचा अंदाज येतो यावरुनच दर काय राहणार हे सांगता येते. पण घटत्या उत्पादनामुळे एप्रिलमध्ये कापसाला विक्रमी दर मिळेल असा अंदाज पणन महासंघाचे माजी व्यवस्थापक गोविंद वैराळे यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांचा ‘तो’ निर्णय आजही फायदेशीर

हंगामाच्या सुरवातीला कापसाच्या उत्पादनात घट होणार हे स्पष्ट असतानाही बाजारपेठेतील दर हे कमीच होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीपेक्षा साठवणूकीवरच अधिकचा भर दिलाच. जो निर्णय सोयाबीनबाबत तोच कापसाच्या पिकाबाबतही घेण्यात आला होता. वाढीव दर मिळाला तरच विक्री अन्यथा साठवणूक. त्यामुळेच आज हंगामाच्या अंतिम टप्प्यात आणि भविष्यातही कापसाचे दर हे कायम राहणार आहेत. सध्या 10 हजारावर कापूस स्थिरावला असला तरी एप्रिलमध्ये दरात वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

‘या’ कापसाला मिळतो वाढीव दर

सरसकट सर्वच कापसाला सारखाच दर असे बाजारपेठेतले चित्र नाही. कापसाच्या दर्जानुसार दर ठरले जातात.धाग्याची लांबी 29 मि.मी पेक्षा अधिक असणाऱ्या तसेच कापसाचा शुभ्रपणा 74 टक्केपेक्षा अधिक असल्यास चांगला दर मिळतो. कापसामध्ये आर्द्रतेचे प्रमाण हे 9 टक्केपेक्षा कमी असावे लागते तर कचऱ्याचे प्रमाण हे 3 टक्केपेक्षा कमी असल्यास अशा कापसाला चांगला दर मिळतो. त्यामुळे केवळ साठवणूकच महत्वाची नाही तर त्याची काळजी घेणेही गरजेचे आहे.

10 हजारावर कापूस स्थिरावला, मात्र भविष्यात..

गेल्या काही दिवसांपासून कापूस 10 हजारावर तर सोयाबीन हे 6 हजार 500 वर स्थिरावलेले आहे. या दोन्ही पिकांच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले आहे. सध्या कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी या महिन्याच्या अखेरीसच कापसाच्या उत्पादनाबद्दल अधिकृत सांगता येणार आहे. मात्र, उत्पादन घटले हे निश्चित असून ज्या शेतकऱ्यांनी योग्य पध्दतीने कापसाची साठवणूक केली त्यांना वाढीव दर मिळणारच असा कृषितज्ञांचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या :

Summer Onion : वाढीव कांदा उत्पादनाचे करायचे काय? सरकारच्या धोरणावरच कांदा दराचे भवितव्य..!

ज्याच्यावर सारा पैसा लावला, ते पिक घटलं, वरखर्च देणारा भाजीपालाही कवडीमोलाचा, सांगा शेती करायची कशी ?

Drone Farming : केंद्राचा निर्णय, राज्याची अंमलबजावणी, कृषी विद्यापीठांमध्ये काय आहेत हालचाली?

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.