AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन कलर थीम आणि स्पोर्टी लूकसह 2022 Yamaha YZF-R3 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

जपानची वाहन निर्माता कंपनी यामाहा मोटरने (Yamaha Motor) अलीकडेच त्यांच्या लोकप्रिय मोटरसायकल 2022 वायझेडएफ आर3 (2022 YZF-R3) चं रिव्हाईज्ड व्हर्जन सादर केलं आहे. जे नुकतेच तैवानमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. आगामी काळात ते इतर देशांमध्येही लाँच केले जाऊ शकते.

नवीन कलर थीम आणि स्पोर्टी लूकसह 2022 Yamaha YZF-R3 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Yamaha-YZF-R3Image Credit source: Yamaha Motor India
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 27, 2022 | 6:10 PM
Share

मुंबई : जपानची वाहन निर्माता कंपनी यामाहा मोटरने (Yamaha Motor) अलीकडेच त्यांच्या लोकप्रिय मोटरसायकल 2022 वायझेडएफ आर3 (2022 YZF-R3) चं रिव्हाईज्ड व्हर्जन सादर केलं आहे. जे नुकतेच तैवानमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. आगामी काळात ते इतर देशांमध्येही लाँच केले जाऊ शकते. मात्र, ही नवीन मोटरसायकल भारतात कधी दाखल होईल, याबाबत कसलीही माहिती समोर आलेली नाही. अपडेटेड 2022 YZF R3 मोटारसायकलवर नवीन कलर स्कीमसह शानदार डिझाइन देण्यात आलं आहे. ही बाइक आता विविड ऑरेंज (Vivid Orange) पेंट स्कीममध्ये सादर करण्यात आली आहे. यापूर्वी रेसिंग ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक अशा रंगांमध्ये मोटरसायकल विकली जात होती. दरम्यान, यामाहा मोटर इंडियाने अलीकडेच तामिळनाडूमधील कोईम्बतूर आणि इरोड येथे त्यांचे दुसरे ‘ब्लू स्क्वायर’ आउटलेट उघडण्याची घोषणा केली.

  1. 2022 YZF-R3 ची किंमत: तैवानमध्ये, 2022 Yamaha YZF-R3 ची किंमत TWD 2,70,000 (जवळपास 7.2 लाख रुपये) इतकी आहे. प्रीमियम टू-व्हीलर या वर्षाच्या अखेरीस भारतात लॉन्च होऊ शकते.
  2. 2022 YZF-R3 चे डिझाईन : नव्याने सादर करण्यात आलेला विविड ऑरेंज पेंट थीम फ्यूल टँक, फ्रंट फेंडर आणि फेअरिंगच्या वरच्या भागावर थीमसह डिझाइन केली गेली आहे. यासोबतच स्पोर्टी दिसणारी ड्युअल टोन फिनिश सादर करण्यात आली आहे. मोटरसायकलच्या उर्वरित डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
  3. 2022 Yamaha YZF-R3 चे स्पेसिफिकेशन्स : बाईकला मस्क्यूलर फ्युएल टँक, स्प्लिट-स्टाईल सीट्स, एक अपस्वेप्ट एक्झॉस्ट, एक पारदर्शक विंडस्क्रीन, सोनेरी रंगाचे फ्रंट फोर्क्स, व्हेंट्स आणि बाणाच्या आकाराचे आरसे आहेत. बाईक प्रकाशासाठी ऑल-एलईडी सेटअप, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि डिझायनर ब्लॅक-आउट व्हीलसह येते. बाईकच्या इतर फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये एलईडी लायटिंग, एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एबीएस तंत्रज्ञान समाविष्ट आहे.
  4. 2022 Yamaha YZF-R3 चं इंजिन : मोटरसायकल त्याच 321cc, पॅरलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिनसह सुसज्ज आहे जे 10,750rpm वर 40.4bhp आणि 9,000rpm वर 29.4Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशन आणि स्लिप्ड क्लचशी जोडलेले आहे. बाईकवरील सस्पेन्शन किटमध्ये अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क्स, रियर मोनोशॉकचा समावेश आहे.

इतर बातम्या

सिंगल चार्जवर 220 KM रेंज, Komaki DT3000 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच

सर्वात मोठी चाकं असलेली इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Car Insurance | वाहन विमा घेताय? या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष; चांगल्या डीलसाठी रहा आग्रही

Follow Us
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल