AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात वडिलांचा मृतदेह अन् कुटुंबीयांचं भलतंच वागणं; 3 दिवसांनी अंत्यसंस्कार, गावात खळबळ

अशी एक घटना समोर आली आहे, जी विचार करायला भाग पाडत आहे. घरात वडिलांची बॉडी, पण तिच्यावर तब्बल तीन दिवस अंत्यसंस्कार लांबले, काय होतं कारण?

घरात वडिलांचा मृतदेह अन् कुटुंबीयांचं भलतंच वागणं; 3 दिवसांनी अंत्यसंस्कार, गावात खळबळ
तीन दिवस अंत्यसंस्कार नाही, नेमकं काय झालं?Image Credit source: social media
| Updated on: Oct 16, 2026 | 10:51 PM
Share

पैसा, संपत्ती, पद आणि प्रतिष्ठा यासाठी जगामध्ये अनेकदा वाद विवाद होतात. त्याचाच प्रत्यय आणखी एका घटनेतून आला आहे. पण ही घटना एवढ्यापूर्ती मर्यादित नाही तर माणुसकीवर कलंक लावणारी पण आहे. ही घटना समजल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना तेलंगणामध्ये घडली आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी एकत्र येऊन अंत्यसंस्कार करण्याऐवजी मालमत्तेवरून वाद घातला. हा वाद इतका वाढला की, तब्बल 3 दिवस मृतदेह घरातच पडून होता. ग्रामस्थांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि त्यानंतर वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

ही घटना तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील कोनायपल्ली गावातील आहे. कोंकटी चंद्रय्या असं मृत व्यक्तीचं नाव असून, त्यांचं वय 80 वर्षे होतं. ते गेली काही दिवस सातत्याने आजारी पडत होते. वाढत्या आजारांमुळे सोमवारी (12 ऑक्टोबर) रात्री त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या निधनानंतर कुटुंबात मालमत्तेच्या वाटणीवरून वाद सुरू झाला. त्यामुळे अंत्यसंस्काराच रखडले गेले.

दीड एकर जमीन अन् घरावरून वाद

चंद्रय्या यांच्या नावावर दीड एकर शेती आणि एक घर होतं. त्यांना तीन मुली होत्या, तर त्यांचा मुलगा नागराजू याचं 10 वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. नागराजूच्या दुसऱ्या पत्नीने आणि तिच्या दोन मुलींनी मालमत्तेत वाटा मागितल्याने कुटुंबात वाद निर्माण झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, चंद्रय्या यांनी 3 वर्षांपूर्वीच घर मुलींच्या नावावर केलं होतं.

अखेर पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप

घरातील वाद मिटवण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबीयांमध्ये सहमती होऊ शकली नाही. अखेर ग्रामस्थांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर बुधवारी रात्री चंद्रय्या यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मालमत्तेच्या वादामुळे एका वृद्धाच्या अंत्यसंस्कारासाठी 3 दिवस वाट पाहावी लागल्याने या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा