AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षभर CEO म्हणून महिना रग्गड 2.80 लाख पगार घेतला,राजीनामा दिला आणि पितळ उघडं पडलं

बनावट बँक स्टेटमेंट आणि अनुभव पत्रांच्या आधारे ग्वाल्हेरमध्ये सीईओ बनलेल्या देवेंद्र दुबे याला कानपूरमधून ग्वाल्हेर गुन्हे शाखेने अटक केली.

वर्षभर CEO म्हणून महिना रग्गड 2.80 लाख पगार घेतला,राजीनामा दिला आणि पितळ उघडं पडलं
ceo
| Updated on: Sep 28, 2026 | 9:17 PM
Share

कोणत्याही मोठ्या कंपनीत महत्वाच्या मोठ्या पदावर नोकरी मिळण्यासाठी तुमचा अनुभव आणि सॅलरीशी संबंधित डॉक्युमेंट जमा करणे सामान्य प्रक्रिया आहे. परंतू मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक अशी घटना घडली आहे. ज्यात एका इसमाने या प्रक्रियेला खोटे दस्ताएवेज सादर करुन पार केले. त्याने स्वत:ला एका मोठ्या ग्रुपचा माजी कर्मचारी असल्याचे भासवले. लाखो रुपयांचा पगार मिळाल्याचे भासवले आणि ऑटोमोबाईल कंपनीत मोठ्या पदावर नोकरी मिळवली.

हे प्रकरण येथेच थांबले नाही तर कंपनीने या इसमाचे काम पाहून त्याला ग्रुपचे व्हाईस प्रसिडेंटहून पदाच्या पुढे जाऊन ग्रुप CEO (आफ्टर सेल्स)ची जबाबदारी सोपवली. सुमारे नऊ महिन्यानंतर हा इसम कंपनीत मोठ्या हुद्यावर काम करत राहिला. परंतू मे २०२६ मध्ये अचानक त्याने राजीनामा दिला. त्याच्या राजीनाम्यानंतर कंपनीने जेव्हा त्यांच्या फूल अँड फायनल सेटलमेंटची प्रक्रिया सुरु केली. तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला. कारण त्याच्या कागदपत्रांची दुसऱ्यांदा तपासणी झाली. ज्या कागदपत्रांच्या आधारे त्याने कंपनीत एवढे मोठे पद मिळवले होते. येथून याला नाट्यमय वळण मिळाले.

ग्वाल्हेर क्राईम ब्रँचनुसार आरोपी देवेंद्र कुमार दुबे ( 43 ) हा मुळचा कानपूर उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. देवेंद्र कुमार याने 20 ऑगस्ट 2025 रोजी श्रीतुलजा भवानी ऑटोमोबाइल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ग्रुप व्हाईस प्रेसिडन्ट पदावर जॉब मिळवला होता.या जॉबसाठी त्यांनी जुने अनुभव आणि सॅलरी संबंधित कागदपत्र कंपनीला सादर केली होती. यातील एक एक्सपिरियन्स सर्टीफिकेट आणि लँडमार्क ग्रुपच्या नावाने तयार झालेले बँक स्टेटमेंट सामील होते. या बँक स्टेटमेंटमध्ये त्याचा महिन्याचा पगार 2 लाख 80 हजार 670 दाखवला होता. या कागदपत्रावर दुबे याच्या सह्याही होत्या. या कागदपत्रांमुळे कंपनीला विश्वास झाला की हा आधी लँडमार्क ग्रुपमधला अनुभवी कर्मचारी राहिलेला आहे.आणि त्याला पावणे तीन लाख रुपये महिना वेतन मिळत होते. त्यामुळे त्यानंतर त्याला या कंपनीत मोठ्या पदावर नियुक्त केले गेले.

व्हाईस प्रेसिडन्ट ते ग्रुप CEO

नोकरी मिळाल्यानंतर देवेंद्रने कंपनीत काम सुरु केले. कंपनीचे मॅनेजमेंटच्या त्याच्या कामावर खूष होते. या दरम्यान त्याच्या जबाबदारीत वाढ केली गेली. आणि त्याला ग्रुप सीईओ ( आफ्टर सेल्स ) चा कारभार सोपवण्यात आला. नऊ महिने सर्वकाही सुरळीत सुरु होते. नंतर मे २०२६ मध्ये देवेंद्र याने अचानक राजीनामा दिला. हा राजीनामा नंतर त्याला थेट तरुंगात घेऊन गेला.

राजीनामा दिला आणि पश्चाताप झाला

नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्या फुल एंड फायनल सेटलमेंट तयार केला जात होता. या दरम्यान HR टीमने दुबे याच्या जुन्या रोजगार आणि वेतनाशी जोडलेल्या दस्ताऐवजांची दुसऱ्यांदा छाननी सुरु केली. कंपनीने ज्या लँडमार्क ग्रुपमध्ये काम केल्याचा दावा दुबने केला होता. तेथे तो नक्की काम करत होता की नाही याची चौकशी सुरु केली. त्यानंतर कहानी उलटली. तपासात देवेंद्र याने लँडमार्क ग्रुपमध्ये नोकरी केली नसल्याचे उघडकीस आले. तेथे त्याच्या नोकरीचे कोणतेच रेकॉर्ड नव्हते. मग त्याने दिलेल्या २.८० लाख सॅलरीच्या स्टेटमेंटचा संशय आल्याने ते ही तपासले गेले. ते ही बोगस असल्याने एचआर टीमने कंपनी व्यवस्थापनाला कळवले. कंपनीने ग्वाल्हेर क्राईम ब्रँचमध्ये तक्रार केली. अखेर कानपूरमधून या भामट्यास अटक करण्यात आली.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...