AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omicron | कर्नाटकपाठोपाठ गुजरातमध्येही सापडला ओमिक्रॉनचा रुग्ण; व्हायब्रंट गुजरातवर संकटाचं सावट?

सोमवार-मंगळवारी चार जिल्ह्यात विदेशातून 220 प्रवासी आले आहेत. तर गुरुवारी दुपारी एकाच दिवसात 14 हायरिस्क देशातून आणखी 2 हजार 235 लोक गुजरातला आले होते. त्यातील 2 हजार 228 प्रवासी अहमदाबाद आणि सूरत एअरपोर्टचे होते.

Omicron | कर्नाटकपाठोपाठ गुजरातमध्येही सापडला ओमिक्रॉनचा रुग्ण; व्हायब्रंट गुजरातवर संकटाचं सावट?
कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्डचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ओमिक्रॉनची लागण
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Dec 04, 2021 | 3:01 PM
Share

गुजरात : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने आता गुजरातमध्येही शिरकाव केला आहे. गुजरातमधील जामगनरमधील एका व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी परदेशातून गुजरातमध्ये आलेल्या 11 लोकांना आरटीपीआरनंतर क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी एका 72 वर्षीय व्यक्तीची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याचे स्वॅब ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पुण्याच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. 72 तासानंतर या व्यक्तीचा अहवाल आल्यानंतर त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिवाळीत 500 लोककांची ट्रॅव्हल हिस्ट्री

गुजरातमध्ये सध्या व्हायब्रंट गुजरात कार्यक्रम सुरू आहे. यासाठी परदेशातून अनेक लोक येत आहेत. तसेच गुजरातमध्ये दिवाळीत 500 लोकांची ट्रॅव्हल हिस्ट्री राहिली आहे. सोमवार-मंगळवारी चार जिल्ह्यात विदेशातून 220 प्रवासी आले आहेत. तर गुरुवारी दुपारी एकाच दिवसात 14 हायरिस्क देशातून आणखी 2 हजार 235 लोक गुजरातला आले होते. त्यातील 2 हजार 228 प्रवासी अहमदाबाद आणि सूरत एअरपोर्टचे होते. दरम्यान गुजरातमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्याने राज्याच्या आरोग्य विभागात खळबळ माजली आहे.

गुजरातमध्ये आठ शहरांमध्ये नाईट कर्फ्यू

दरम्यान ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेत गुजरात सरकारने याआधीच राज्यातील आठ शहरांमध्ये 10 दिवसांसाठी नाईट कर्फ्यू लागू होता. या कर्फ्यूत 10 डिसेंबरपर्यंत वाढही करण्यात आली होती. अहमदाबाद, राजकोट, सुरत, वडोदरा, जामनगर, भावनगर, गांधीनगर आणि जुनागढ या शहरांमध्ये 10 डिसेंबरपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पहाटे 1 ते पहाटे 5 पर्यंत सुरू हा नाईट कर्फ्यू लागू आहे. (The first Omicron patient was found in Jamganar in Gujarat)

इतर बातम्या

Omicron: मुंबईत फैलाव रोखण्यासाठी वॉर रुम सज्ज, काय आहे महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लॅन?

MumbaiNews: मुंबईकरांसाठी मोठी बातमी, ते 7 जण नेगेटीव्ह, आणखी दोघांच्या रिपोर्टची प्रतिक्षा

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती