AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omicron: मुंबईत फैलाव रोखण्यासाठी वॉर रुम सज्ज, काय आहे महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लॅन?

मुंबईः ओमिक्रॉनचे 30 संशयित मुंबई आढळल्यानंतर महापालिकेने (BMC) तातडीने खबरदारीच्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. हाय रिस्क असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी एक अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. विदेशातून येणाऱ्यांसाठी हा पंचसूत्री अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. आज याची माहिती मुंबईच्या महापौर किशोऱी पेडणेकर (Kishori […]

Omicron: मुंबईत फैलाव रोखण्यासाठी वॉर रुम सज्ज, काय आहे महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लॅन?
मुंबई महापौर किशोरी पेडणेकर
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 04, 2021 | 1:57 PM
Share

मुंबईः ओमिक्रॉनचे 30 संशयित मुंबई आढळल्यानंतर महापालिकेने (BMC) तातडीने खबरदारीच्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. हाय रिस्क असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी एक अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. विदेशातून येणाऱ्यांसाठी हा पंचसूत्री अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. आज याची माहिती मुंबईच्या महापौर किशोऱी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई महापालिकेचा पाचसूत्री अ‍ॅक्शन प्लॅन काय?

– बीएमसीच्या वॉर्डांपर्यंत विदेशातून आलेल्या नागरिकांची लीस्ट पाठवली जाईल. हे नागरिक क्वारंटाइनच्या नियमांचे पालन करत आहेत का, यावर देखरेख ठेवली जाईल. – वॉर रुमच्या सर्व वॉर्डमध्ये 10 अँब्युलन्स तयार राहतील. – महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या टीम असतील. यात प्रवाशांच्या घरी जाऊन नियमांचे पालन करण्यासंबंधी चौकशी आणि तपासणी होईल. – प्रवाशांच्या हौसिंग सोसायट्यांनाही पत्र पाठवले जाईल. त्यांनाही सदर सूचना दिल्या जाील.

सध्या मुंबई ओमिक्रॉनचा रुग्ण नाही- महापौर

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, कोणत्याही सोसायटीत बाहेरील कुणी व्यक्ती आल्यास, त्यावर नजर ठेवावी. त्या व्यक्तीने क्वारंटाइनच्या सर्व नियमांचे पालन करावे. सध्या मुंबई ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही. पण असा रुग्ण यापुढे आढळला तर धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कोरोना नियमांचे कठोरतेने पालन करणे गरजेचे आहे.

मॉल, रस्टॉरंट, रेल्वे, सार्वजनिक वाहतुकीसाठी संपूर्ण लसीकरण आवश्यक

काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने मॉल, रेस्टॉरंट, रेल्वे, सार्वजनिक वाहतुकीसाठी कोरोना लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी मिळेल, असे आदेश दिले होते. अशा ठिकाणी लस न घेतलेली व्यक्ती आढळल्यास संबंधित संस्थेकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, बीएमसीकडे सध्या लसींचा पुरेसा स्टॉक उपलब्ध आहे. त्यामुळे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

इतर बातम्या-

सिलिंडर स्फोटात 72 तासानंतर मुंबई महापौर पोहोचतात, एवढे तास कुठे निजला होतात? भाजप नेते आशीष शेलारांचा सवाल

Mahaparinirvan Din: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्या

Follow Us
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी