AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रेकअपच्या वेदना आणि थेट देवालाच सवाल! अस्वस्थ भावनांना वाट मोकळी करून देणारं एकमेव मराठी गाणं

मराठी सिनेमे आणि त्यातील गाणी अनेकदा सुपरहिटच असतात. या गाण्यांचा मोठा चाहतावर्गही आहे. आज आपण अशाच एका गाण्याबद्दल जाणून घेणार आहोत, जे ब्रेकअपच्या अस्वस्थ भावना इतक्या स्पष्टपणे मांडणारं कदाचित मराठीमधील एकमेव गाणं असेल.

ब्रेकअपच्या वेदना आणि थेट देवालाच सवाल! अस्वस्थ भावनांना वाट मोकळी करून देणारं एकमेव मराठी गाणं
Marathi Breakup SongImage Credit source: social media
| Updated on: Oct 22, 2026 | 10:44 PM
Share

प्रेमात सगळं भारी सुरू असताना अचानक दुरावा येतो आणि डोक्यात प्रश्नांचं काहूर माजतं. ज्याच्यावर जीव लावला, त्यानेच आपल्याला का सोडलं? आपली चूक तरी काय होती? याच अस्वस्थ भावनांना अगदी अचूक शब्द देणारं गाणं म्हणजे ‘दुनियादारी’ सिनेमातलं ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला…’ या गाण्याने अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. सिनेमाही प्रचंड गाजला. यातल्या व्यक्तिरेखा अनेकांना तोंडपाठ आहेत. मग ती सुरेखा असो, दिग्या असो किंवा मग शिरीन, श्रेयस आणि मीनू.

ब्रेकअप झाल्यावर किंवा प्रेमात अपयश आल्यावर हे गाणं अनेकांच्या काळजाला भिडतं. या गाण्याची खासियत म्हणजे, प्रेमात दुखावला गेलेला प्रियकर इथे थेट देवाकडेच तक्रार करतोय, त्यालाच जाब विचारतोय. ‘खरंच प्रेम करणं हा गुन्हा आहे का? माझ्याच वाट्याला हे दुःख का?’ हा गाण्यातला सवाल ऐकताना, ज्यांचा प्रेमभंग झालाय त्यांना हे अगदी स्वतःच्याच मनातलं गाणं वाटायला लागतं.

२०१३ मध्ये आलेल्या संजय जाधव यांच्या ‘दुनियादारी’ने अक्षरशः वेड लावलं होतं. स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, उर्मिला कानेटकर आणि जितेंद्र जोशी यांची तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात मैत्री आणि प्रेमाची गुंतागुंत होती. याच कथेतला भावनिक ट्रॅक या गाण्याने एकदम खास क्लिक केला आहे. मंदार चोळकर यांचे काळजाला भिडणारे शब्द, अमितराज यांचं संगीत आणि या सगळ्यावर कळस म्हणजे आदर्श शिंदे व कीर्ती किल्लेदार यांचा तगडा आवाज. या भन्नाट कॉम्बिनेशनमुळे गाण्यातली घालमेल थेट काळजापर्यंत पोहोचते.

काही गाणी संगीतामुळे तर काही शब्दांमुळे लक्षात राहतात. पण ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ हे गाणं लक्षात राहतं ते देवासोबत साधलेल्या त्या थेट संवादामुळे आणि त्यातल्या वेदनेमुळे. प्रेमभंगानंतर मनात साठलेल्या पण उत्तर न मिळालेल्या प्रश्नांना हे गाणं वाट मोकळी करून देतं. म्हणूनच आजही हे गाणं अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये जागा राखून आहे. या गाण्याला यूट्यूबवर आतापर्यंत ७३ मिलियन व्ह्यूज आहेत.

गाण्याचे बोल

देवा तुझ्या गाभाऱ्यालागाण्याचे बोल वाचा

उंबराच न्हाई

सांग कुठं ठेऊ माथा

कळंनाच काही

देवा कुठं शोधू तुला

मला सांग ना

प्रेम केलं एवढाच

माझा रे गुन्हागाणी ऐका

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी

माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी

आरपार काळजात का दिलास घाव तू

दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू

का कधी कुठे स्वप्न विरले, प्रेम हरले

का कधी कुठे स्वप्न विरले, प्रेम हरलेभाषा शिका

स्वप्न माझे आज नव्याने खुलले

अर्थ सारे स्पर्शाने उलगडले

आरपार काळजात का दिलास घाव तू

दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू

हे देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी

माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी

का रे तडफड ही ह्या काळजा मधी

घुसमट तुझी रे होते का कधी

माणसाचा तू जन्म घे

डाव जो मांडला मोडू दे

का हात सुटले, श्वास मिटले, ठेच लागे

हां का हात सुटले, श्वास मिटले, ठेच लागे

उत्तरांना प्रश्न कसे हे पडले

अंतरांचे अंतर कसे ना कळले

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी

माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी

आरपार काळजात का दिलास घाव तू

दगडाच्या काळजाचा दगडाचा देव त

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी

माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ