AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यापुढे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कराल तर पस्तवाल !, पाहा काय घडामोड होतेय…

यापुढे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे महागात पडणार आहे. केंद्र सरकारला विधी आयोगाने याबाबत हा कायदा कठोर करण्याची शिफारस केली आहे. यासाठीच्या अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे. याबाबत आयोगाने अहवाल प्रकाशित केला आहे.

यापुढे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कराल तर पस्तवाल !, पाहा काय घडामोड होतेय...
public property damage Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 04, 2024 | 9:44 PM
Share

नवी दिल्ली | 4 फेब्रुवारी 2024 : सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे आता चांगलेच भारी पडणार आहे. हा कायदा कठोर करण्याची शिफारस विधी आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. आता सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आरोपीकडून जोपर्यंत या मालमत्तेचे मुल्य वसुल केले जात नाही तोपर्यंत अशा आरोपीला जामिनच मिळू नये अशी शिफारस विधी आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. विधी आयोगाने सार्वजनिक संपत्ती नुकसान निवारण ( पीडीपीपी ) अधिनियमात सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ऋतु राज अवस्थी यांच्या नेतृत्वाखाली कमिटीने आपल्या 284 व्या अहवालात ही शिफारस केली आहे.

सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांना वचक बसविण्यासाठी केंद्र सरकार कठोर कायदा आणण्याच्या विचारात आहे. या संदर्भातील पीडीपीपी अधिनियमात केवळ आरोपींवरील गुन्हा सिद्ध होणे आणि शिक्षेची भीतीच पुरेशी नाही. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांना जामिनाच्या अटी आणि शर्ती आणखीन कठोर होणे गरजेचे असल्याचे आयोगाने म्हटले आहे. जोपर्यंत सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानाची भरपाई आरोपींकडून केली जात नाही, त्यांना जामीनच दिला जाऊ नये असे आयोगाने म्हटले आहे.

आपल्या देशात सर्वाधिक घटना

केंद्र सरकारने साल 2015 मध्ये पीडीपीपी अधिनियमात बदल करण्याचा प्रस्ताव आणला होता. गृहमंत्रालयाने सार्वजनिक संपत्ती क्षति निवारण अधिनियम ( सुधारणा ) विधेयक 2015 चा मसुदा जारी करीत त्यावर सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. परंतू मूळ अधिनियमात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मागे पडला. आपल्या देशात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रकार सर्वाधिक होतात आणि अजूनही सुरु असल्याचे नाकारता येणार नसल्याचे आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

कोणालाही परवानगी नाही

सार्वजनिक संपत्तीची सुरक्षा करणे हे प्रत्येक नागरिकांचे मुलभूत कर्तव्य आहे. तसेच सार्वजनिक संपत्तीचे सुरक्षा करणे त्याच्या हिताचे आहे. सार्वजनिक संपत्तीला नष्ट करण्याची कोणालाही परवानगी देता येऊ शकत नाही. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे सोपे आहे. परंतू त्याची निर्मिती करणे अवघड आहे. सार्वजनिक संपत्ती ही राष्ट्राची संपत्ती असून यात प्रत्येक नागरिकाचा भागीदारी असल्याचे आयोगाने म्हटले आहे. केंद्र सरकारला पाठविलेल्या अहवालात आयोगाने म्हटले की सार्वजनिक संपत्तीच्या विनाशाला गंभीरतेने घ्यायला हवे आणि दोषींवर कठोर कारवाई केली पाहीजे असेही विधी आयोगाने म्हटले आहे.

Follow Us
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार...
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या याचिकेवर सुनावणी सुरु;
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या याचिकेवर सुनावणी सुरु; कोर्टात...
निसर्गाने उधळली सौंदर्याची मुक्त उधळण! साताऱ्याचे धबधबे ओसंडून वाहू...
निसर्गाने उधळली सौंदर्याची मुक्त उधळण! साताऱ्याचे धबधबे ओसंडून वाहू लागले
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं...
NCP | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं...
उद्यापासून संसदेत घमासान? केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
उद्यापासून संसदेत घमासान? केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट, पोलीस बंदोबस्त...
Mumbai | ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट, पोलीस बंदोबस्त...
कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल
KDMC | कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल
दिल्लीत राजकीय घडमोडींना वेग! सर्वपक्षीय बैठकीत मोठा गोंधळ, TMC पक्ष..
दिल्लीत राजकीय घडमोडींना वेग! सर्वपक्षीय बैठकीत मोठा गोंधळ, TMC च्या फुटीर खासदारांना...
शाळेतील मुख्यध्यापिका कॅबिनमध्येच झोपलेल्या अन् मद्यधुंद पतीची थेट..
शाळेतील मुख्यध्यापिका कॅबिनमध्येच झोपलेल्या अन् तिचा मद्यधुंद पती... व्हिडीओच आला समोर
उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, गुणरत्न सदावर्तेंची मागणी, थेट नियम सांगितला, मुंबईतील आंदोलनावर आक्षेप!.

उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, गुणरत्न सदावर्तेंची मागणी, थेट नियम सांगितला, मुंबईतील आंदोलनावर आक्षेप!

ट्रम्प सरकारचा घातक निर्णय, पुन्हा १८ हजार बेकायदा भारतीयांची होणार हकालपट्टी.

ट्रम्प सरकारचा घातक निर्णय, पुन्हा १८ हजार बेकायदा भारतीयांची होणार हकालपट्टी

फिफा वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान दुसऱ्यांदा सर्वात महागड्या ब्रिटीश खेळाडूचा विक्रम मोडला, आता कोटी मोजले गेले.

फिफा वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान दुसऱ्यांदा सर्वात महागड्या ब्रिटीश खेळाडूचा विक्रम मोडला, आता कोटी मोजले गेले

Monsoon update : मोठं संकट, पावसामुळे हाहाकार उडणार, इस्त्रोच्या फोटोंमुळे आयएमडीची झोप उडाली, महाराष्ट्राला मोठा इशारा.

Monsoon update : मोठं संकट, पावसामुळे हाहाकार उडणार, इस्त्रोच्या फोटोंमुळे आयएमडीची झोप उडाली, महाराष्ट्राला मोठा इशारा

IND vs ENG: वादाच्या चर्चा रंगल्या असातना गौतम गंभीर आणि विराट कोहली एकत्र, लंडनमध्ये  नेमकं काय घडलं?.

IND vs ENG: वादाच्या चर्चा रंगल्या असातना गौतम गंभीर आणि विराट कोहली एकत्र, लंडनमध्ये नेमकं काय घडलं?

ठाकरेंच्या आंदोलनात बाचाबाची…  पोडियम स्टेज लावण्यावरून कार्यकर्ते पोलिसांशी भिडले.

ठाकरेंच्या आंदोलनात बाचाबाची… पोडियम स्टेज लावण्यावरून कार्यकर्ते पोलिसांशी भिडले