AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Grahan 2026: या तारखेला लागणार या वर्षाचे दुसरे सुर्यग्रहण, भारतातून दिसणार का ?

Surya Grahan 2026: साल २०२६ मध्ये दोन सुर्यग्रहण लागणार होते. त्यापैकी एक सुर्यग्रहण १७ फेब्रुवारी रोजी लागले होते. आता वर्षाचे दुसरे सुर्यग्रहण लागणार आहे.

Surya Grahan 2026: या तारखेला लागणार या वर्षाचे दुसरे सुर्यग्रहण, भारतातून दिसणार का ?
ring of fire
| Updated on: May 29, 2026 | 10:29 PM
Share

खगोल प्रेमीसाठी सुर्यग्रहणाची घटना खास मानली जाते. कारण या वेळेत आकाशात अद्भूत नजारा पाहायला मिळत असतो. तर धार्मिक लोकांसाठी सुर्यग्रहणाचे वेगळे महत्व आहे. हिंदू धर्मानुसार सुर्यग्रहणाला अशुभ मानले जाते. ते आरोग्यासाठी देखील हानिकारक मानले जाते. यामुळे सुर्यग्रहणाचा सुतक काल लागताच काही कार्ये केली जात नाहीत. या काळात कोणतेही काम करु नये जाणून घेणे महत्वाचे असते. तर पाहूयात या वर्षाचे दुसरे सुर्यग्रहण केव्हा लागणार आहे. आणि ते भारतातून दिसणार आहे की नाही.

सूर्य ग्रहण 2026 ची तारीख आणि वेळ (Solar eclipse 2026 Date)

भारतीय वेळेनुसार हे ग्रहण १२ ऑगस्टच्या रात्री लागेल. ग्रहण (Partial Phase) रात्री ९.०४ वाजता सुरु होईल आणि सकाळी ४.२५ वाजता ( १३ ऑगस्ट ) रोजी संपेल. सुर्यग्रहणाचा मुख्य अवस्था ६ मिनिटे २३ सेकंदापर्यंत राहिल. यामुळे या सुर्यग्रहणाला सर्वाधिक दीर्घ कालावधीचे ग्रहण म्हटले जात आहे.

भारतातून दिसणार का वर्षाचे दूसरे सूर्य ग्रहण

जेव्हा सुर्यग्रहण लागेल तेव्हा भारतात रात्रीची वेळ असल्याने सहाजिकच भारतातून हे ग्रहण दिसणार नाही. तसेच भारतात या ग्रहणाचा सूतक काळ मान्य असणार नाही. ज्या स्थानावर ग्रहण दिसत नाही, तेथे ग्रहणाचा सूतक काळ पाळण्याची गरज नाही. त्यामुळे १२ ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्येला देवाची पूजाअर्चा, स्नान-दान आणि तर्पण आदीशी संलग्न कामे करण्यात काही अडचणी नाहीत.

सुर्यग्रहण कोठून दिसणार ?

१२ ऑगस्ट रोजी लागणारे सुर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे भारतवासियांना आकाशातील ‘रिंग ऑफ फायर’ अद्भूत दुर्लभ नजारा पाहायला मिळणार नाही.मात्र, नासाद्वारा सुर्यग्रहणाची लाईव्ह स्ट्रीमिंग युट्युब चॅनलवर पाहाता होणार आहे. तुम्ही ऑनलाईन माध्यमातून या ग्रहणाला पाहू शकतो. या वर्षाचे हे दुसरे सुर्यग्रह ग्रीनलँड, आईसलँड, स्पेन आणि आर्क्टिक्ट क्षेत्रातील देशातून दिसणार आहे.

कोणती रास आणि नक्षत्रात लागणार ग्रहण

ज्योतिष शास्रानुसार १२ ऑगस्ट २०२६ रोजी लागणारे सुर्यग्रहण कर्क रास आणि आश्लेषा नक्षत्रात लागणार आहे. ज्योतिष शास्रात ग्रहणाचा देश-जगाच्या घडामोडींवर परिणाम होऊ शकतो.

चंद्राच्या राशीत सुर्यग्रहण – कर्क राशीचा स्वामी चंद्र देव आहे. ज्याला ज्योतिष शास्रात मनाचा कारक मानला जातो. त्यामुळे ग्रहणाचा प्रभाव मुख्य रुपाने व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर परिणाम टाकू शकतो.

बुध नक्षत्र- आश्लेषा नक्षत्राचा स्वामी बुध आहे. अशात या ग्रहणाने बुद्धी- व्यापार आणि संचार सारख्या क्षेत्रात मोठे बदल किंवा घडामोडी घडू शकतात.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक