असं एक गाव, गावात पाऊल ठेवताच माणूस होतो आंधळा, प्राण्याचीही जाते दृष्टी, कारण ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही
तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही, मात्र हे सत्य आहे की असं एक गाव आहे, ज्या गावातील जवळपास सर्वच लोक आंधळे आहेत. लोकच काय इथे प्राण्यांना देखील दिसत नाही, या पाठीमागे एक धक्कादायक कारण आहे.

मेक्सिकोच्या दुर्गम भागामध्ये असं एक गाव आहे, ज्या गावाच्या नावासोबत अनेक रहस्य जोडले गेलेले आहेत. असं म्हटलं जातं की, या गावात येताच लोकं आंधळे होतात. माणसंच नाही तर या गावात जनावरे देखील आंधळे आहेत. हे गाव दक्षिणी मेक्सिकोच्या ओक्साका राज्यात आहे. टिल्टेपेक असं या गावाचं नाव आहे. या गावातील लोकांमध्ये आंधळेपणाची समस्या दिसून येते. या गावातील प्रत्येक पिढीतील लोकं हे आंधळेच आहेत. या गावातील लोकं आंधळेपणाचा संबंध हा तेथील एका शापित वृक्षाशी जोडतात. मात्र वैज्ञानिकांच्या तपासणीमध्ये वेगळंच कारण समोर आलं आहे. टिल्टेपेक गावात जापोटेक समुहाचे लोक राहतात. या लोकांचा या भागात आढळून येणाऱ्या बाविनी नावाच्या झाडावर विश्वास आहे. या झाडाला लावजेला असं देखील म्हटलं जातं. जो कोणी या झाडाला पाहीलं, तो आंधळा होतो, असा या लोकांचा अंधविश्वास आहे.
लोकांच्या या विश्वासामुळेच या गावाचा समावेश हा जगातील रहस्यमयी गावांमध्ये होतो. या झाडाला आधीपासूनच खतरनाक मानलं जात होतं. या झाडासंदर्भात येथील लोकांच्या आधीपासूनच विविध समजुती होत्या. त्यात भरीस भर म्हणून या गावात आंधळेपणाची समस्या निर्माण झाली, या गावातील अनेक लोकांना तसेच जनावरांना देखील अंधत्व आलं. त्यामुळे जो व्यक्ती या झाडाला पहातो, तो आंधळा होतो, असा समज देखील या लोकांमध्ये प्रचलित झाला.
मात्र जेव्हा डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी या गावात जाऊन शोध घेतला, लोकांची तपासणी केली तेव्हा या मागचं खरं कारण समोर आलं आहे. या लोकांना कोणत्या झाडामुळे आंधळेपणा आलेला नाही, तर या संपूर्ण परिसरात विशिष्ट प्रजातीचे कीटक आढळून येतात. ते कीटक चावल्यामुळे या लोकांना आंधळेपणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. या गावात येणाऱ्या लोकांना जेव्हा हे कीटक चावा घेतात, तेव्हा या किटकांच्या शरीरातून विशिष्ट प्रकारचे परजीवी बाहेर पडून त्यांच्या शरीरात प्रवेश करतात. हे परजीवी थेट डोळ्यांच्या रेटीनावर हल्ला करतात, त्यामुळे आंधळेपणा येतो, असं निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे.
