‘पुन्हा एकदा फाळणी झाली पाहिजे’, बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या वक्तव्याने खळबळ

Bageshwar Baba Dhirendra Krishna Shastri : बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. प्रभू श्रीराम आणि भगवान कृष्ण यांच्यावरील टिप्पणीनंतर आता फाळणीवर त्यांनी वक्तव्य केले आहे.

पुन्हा एकदा फाळणी झाली पाहिजे, बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या वक्तव्याने खळबळ
'पुन्हा एकदा फाळणी झाली पाहिजे', बागेश्वर बाबांच्या वक्तव्याने खळबळ
| Updated on: Nov 18, 2026 | 7:51 AM

India Pakistan Partition: बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे सध्या चर्चेत आहेत. सध्या सनातन धर्माला मुस्लिमांकडून इतका धोका नाही, जितका हिंदूंपासून हिंदूंना आहे. काही हिंदू हे हिंदूंवर कलंक असल्याचा दावा बाबांनी केला आहे. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांचा राम मंदिर दौरा आणि निवडणुकीदरम्यान रामकथा करण्याविषयीच्या त्यांच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबांनी अशी प्रतिक्रिया दिली. प्रतापगढमधील कुंडा येथे रामकथेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की त्यांची रामकथा ही निवडणुकीसाठी नाही, तर सनातन धर्मासाठी आहे. हिंदूंनी एकता करावी, मथुरेत भगवान श्रीकृष्ण जन्मभूमी आणि पाकिस्तानातील हिंदूंना भारतीय नागरिकता द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

पाकिस्तानातील हिंदूंना नागरिकता देण्याची मागणी

Loading...

रामकथेनंतर धीरेंद्र शास्त्री यांनी पाकिस्तान राहणाऱ्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व देण्याची मागणी केली. पाकिस्तानात राहत असलेल्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व देण्यात यावे. माझी तर मागणी आहे की, “पुन्हा एकदा फाळणी व्हावी. पाकिस्तानमधील सर्व हिंदूंनी भारतात यावे. सध्या सनातन धर्माला मुस्लिमांकडून जितका धोका नाही. तितका तो हिंदूंपासून आहे. काही हिंदू हे आपल्या धर्मावर कलंक आहेत. आमच्या नजरेत राघव आणि माधव मध्ये कोणतेही अंतर नाही. श्याम आणि राममध्ये कुठलेही अंतर नाही. यादव आणि माधव दोन नाही, तर एकच आहे. आपण सर्व हिंदू एकच आहोत.” असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

हिंदूंसाठी 100 वेळा माफी मागेल

हिंदूंमध्ये एकजुटता राहावी आणि त्यांच्यात वाद होऊ नये, यासाठी मी शंभरदा माफी मागेल असे बागेश्वर बाबा म्हणाले. प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावरील टिप्पणीनंतर बाबांचे स्पष्टीकरण समोर आले आहे. मी गोळी खायला तयार आहे. पण हिंदूमध्ये वाद होऊ नये. त्यांच्यात एकजुटता राहावी. मी लवकरच वृंदावन येथे ठाकूर धाममध्ये जाणार असल्याचे बागेश्वर बाबांनी सांगितले.

अखिलेश यादव यांच्यावर निशाणा

अखिलेश यादव यांनी निवडणुकीच्या काळात रामकथा आयोजित करण्यावरून भाजपवर निशाणा साधला होता. त्यावर बागेश्वर बाबांनी टिप्पणी केली. रामकथा या निवडणुकीसाठी होत नाही तर सनातन धर्मासाठी होत असल्याचे ते म्हणाले. आता रामललाच्या दर्शनासाठी जात असलो तरी या कार्यक्रमानंतर कृष्णललाचे दर्शन घेणार असल्याचे ते म्हणाले. लवकरच ठाकूर धाममध्ये भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us