ही पाच रुपयांची वस्तू म्हणजे सापांवर रामबाण उपाय, खिशात ठेवा आयुष्यात पुन्हा साप कधी जवळ येणार नाहीत

साप म्हटलं की आपल्याला भीती वाटते, पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा साप हे आपल्या परिसरात आढळून येतात, कधी-कधी तर ते घरात देखील शिरतात. अशावेळी सापांपासून बचाव करणं गरजेचं असतं. अशा काही वनस्पती आहेत, ज्या आपल्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे सापांना आपल्यापासून दूर ठेवण्याचा काम करतात.

ही पाच रुपयांची वस्तू म्हणजे सापांवर रामबाण उपाय, खिशात ठेवा आयुष्यात पुन्हा साप कधी जवळ येणार नाहीत
Snake
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 03, 2026 | 8:23 PM

साप म्हटलं की आपल्याला भीती वाटते, सर्व सामान्यपणे सापांना धोका जाणवला तरच ते तुमच्यावर हल्ला करतात, किंवा दुसरं म्हणजे जेव्हा त्यांना वाटतं की आपली शिकार आहे, अशाही परिस्थितीमध्ये ते आपल्यावर हल्ला करू शकतात. मात्र इतर वेळी ते आपल्याला कोणतंही नुकसान पोहोचवत नाही, मात्र तरी देखील आजही अनेक ठिकाणी गैर समजामुळे सापांना मारलं जात आहे. अनेकदा दिसला साप की आपण त्याला लगेच मारतो. मात्र तसं न करता त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी ते सापांना पकडून त्याच्या आधिवासात सोडतील. अनेकदा सापांना मारलं जात असल्यामुळे भारतामधील सापांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात. परंतु त्यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच विषारी असतात. परंतु साप विषारी नाही म्हणून त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नये, यामुळे तुम्हाला धोका देखील निर्माण होऊ शकतो.

अलिकडच्या काळात घोणस आणि नाग या सारख्या सापांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, या सापांचा मानवी वस्तीजवळचा वावर देखील वाढला आहे. घोणस साप तर कुठेही आढळून येत आहेत. हा साप अत्यंत विषारी असतो, या सापाच्या चाव्याचं प्रमाण देखील इतर सापांपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये सापांपासून बचावाचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपलं घर तसेच परिसर स्वच्छ ठेवणे जर आपल्या घराच्या आसपास बाग असेल तर अशा बागेमध्ये गवत वाढू न देणे, यामुळे सापांना तिथे लपण्यासाठी जागा सापडणार नाही आणि ते तीथून दूर निघून जातील.

Loading...

परंतु या उपायांसोबत दुसरा देखील एक उपाय आहे, तो म्हणजे काही वनस्पती अशा असतात ज्यांच्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे साप या वनस्पतींपासून दूर राहतो. आजही ग्रामीण भागांमध्ये आणि आदिवासी पाड्यांमध्ये हे उपाय केले जातात. अशीच एक वनस्पती आहे ती म्हणजे सर्पगंधाची वनस्पती ही वनस्पती नुसती घरात जरी लावली किंवा या वनस्पतीच्या वाळलेल्या काड्या जवळ ठेवल्या तरी साप त्या परिसरात येत नाही अशी मान्यता आहे. या वनस्पतीच्या काड्या तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये अगदी कमी किंमतीमध्ये म्हणजे पाच रुपयांच्या देखील मिळू शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us