हे झाड म्हणजे सापाचा पक्का दोस्त; घरात चुकूनही लावू नका, साप बाहेर जाणारच नाही
असे काही झाडं आणि वनस्पती असतात ज्याच्या विशिष्ट गुणधर्मामुळे साप या झाडांकडे आकर्षित होतात. अशी झाडं घरामध्ये लावणं धोकादायक ठरू शकतं. अनेकदा या झाडांखाली साप आढळून येतात.

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, उन्हाळ्यामध्ये साप बिळातून बाहेर निघण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. कारण जमीन तापल्यामुळे त्यांना उष्णतेचा त्रास होतो. अशावेळी साप सुरक्षित आणि थंड निवाऱ्याच्या शोधात असतात. त्यामुळे ते तुमच्या घरात घुसण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तसेच पावसाळ्यामध्ये देखील पावसाचं पाणी बिळात शिरल्यामुळे साप बिळातून वर येतात आणि निवाऱ्यासाठी कोरडी जागा शोधतात. त्यामुळे पावसाळा आणि उन्हाळ्यात संर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. जर एखाद्या व्यक्तीला साप चावला तर चुकूनही वेळ न घालवता अशा व्यक्तीला तातडीने वैद्यकीय उपचार मिळून दिले पाहिजे, त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलं पाहिजे.
अनेकांना बागकामची आवड असते, अनेकजण आपल्या घराच्या परिसरात विविध फळांची, फुलांची झाडं लावतात. मात्र काही झाडं अशी असतात की त्यांच्या विशिष्ट गुणधर्मामुळे साप या झाडांकडे आकर्षित होतो. त्यामुळे शक्यतो अशी झाडं एकदम घराशेजारी किंवा घरात लावणं टाळलं पाहिजे, किंवा जरी अशी झाडं आपण घरात लावलीच तर योग्य ती काळजी घेतली पाहिजे. अशा झाडाची मशागत करताना किंवा त्या खाली जर बसायचं असेल तर सर्व परिसर नीट लक्षपूर्वक पाहिला पाहिजे, कारण अशा ठिकाणी साप असल्याची शक्यता असते.
आज आपण ज्या झाडाची माहिती घेणार आहोत, ते झाड आहे चाफ्याचं. चाफ्यांच्या फुलांना सुंदर वास असतो. त्यामुळे अनेकजण हे झाडं आपल्या घरात लावतात. परंतु चाफ्याचं एक वैशिष्ट असं असतं की जिथे चाफ्याचं झाडं लावलं आहे, तिथे जमीन आपोआप भुसभुशीत होते. अशा ठिकाणी बिळ सहज बनू शकतं, त्यामुळे या झाडाच्या आसपास उंदीर आणि घुशींचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. उंदीर आणि घुशी अशा झाडाखाली बिळ करतात.
उंदीर आणि घुशी हे सापाचं मुख्य अन्न आहे, त्यामुळे नागासारखे विषारी साप उंदीर खाण्यासाठी अशा ठिकाणी येतात. त्यामुळे सर्पदंश होऊ शकतो. तसेच चाफ्याचे पानं ही लांब असतात. ती खाली पडल्यानंतर त्यामुळे त्या परिसरात अडचण निर्माण होते, सापांना लपण्यासाठी जागा सापडते त्यामुळे देखील साप इथे येऊ शकतात. जर चाफ्याचं झाड मोठं असेल तर चाफ्याच्या झाडांवर काही पक्षी आपली घरटी करतात, पक्ष्यांची अंडी खाण्यासाठी धामण प्रजाती सारखे साप इथे येऊ शकतात. त्यामुळे नेहमी काळजी घ्यावी .
