AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HIV : तब्बल 350 लोक HIV पॉझिटिव्ह, सहज चाचणी केली अन् धक्काच बसला!

एचआयव्हीची लागण असल्याचे समोर आलेल्यांपैकी 351 जण उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. तर उरलेल्या सहा जाणांवर अद्यापही उपचार बाकी आहेत. त्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचे माहितीच नव्हते.

HIV : तब्बल 350 लोक HIV पॉझिटिव्ह, सहज चाचणी केली अन् धक्काच बसला!
hiv positive Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 18, 2026 | 6:47 PM
Share

HIV Positive : एचआयव्ही हा विषाणू जीवघेणा आहे. माणसाला या विषाणूचे एकदा संक्रमण झाले की हळूहळू प्रकृती खालावत जाते. त्यानंतर व्यक्तीला एड्स हा आजार जडतो. एचआयव्हीची लागण झाल्याचे योग्य वेळी न समजल्यास नंतर त्याचे गंभीर परिणाम उद्भवू शकतात. म्हणूनच एचआयव्ही चाचणी करणे गरजेचे आहे, असे मानले जाते. एचआयव्हीचे संक्रमण रोखण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात लोकांच्या चाचण्या करते. तसेच या विषाणूची लागण झाल्यास त्यावर उपचारही मोफत केला जातो. दरम्यान, सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वैद्यकीय महाविद्यालयातच 200 पेक्षा जास्त लोकांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले आहे.

तपासणी केली असता धक्कादायक प्रकार समोर

मध्य प्रदेशमधील इंदोर या जिल्ह्यात एप्रिल आणि सप्टेंबर 2026 या काळात एचआयव्ही चाचणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिबिरं आयोजित करण्यात आली. या शिबिरांमध्ये तब्बल 44,259 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी साधारण 357 लोकांना एचआयव्हीची लागण असल्याचे समोर आले. हा प्रकार समोर आल्यानंतर लोकांमध्ये एचआयव्ही आणि एड्स या आजाराची माहिती देणे, त्यांच्यात जागरुकता घडवून आणणे किती गरजेचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

एचआयव्हीची लागण असल्याचे समोर आलेल्यांपैकी 351 जण उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. तर उरलेल्या सहा जाणांवर अद्यापही उपचार बाकी आहेत. त्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचे माहितीच नव्हते. ही घटना समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने सजग राहून वेळोवेळी एचआयव्हीची चाचणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिबिरे राबवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जातेय.

कॉलेजमध्ये किती एचआयव्ही बाधित आढळले?

दरम्यान, इंदोरच्या एका वैद्यकीय महाविद्यालयातही 1152 लोकांपैकी 215 लोक एचआयव्ही बाधित असल्याचे समोर आले. 209 रुग्णांवर एआरटी उपचार सुरू आहेत. सहा जणांवर अजूनही उपचार बाकी आहेत. दरम्यान, एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्वरित उपचार घेतल्यास एड्स होण्याचा धोका टाळता येऊ शकतो. त्यामुळेच याबाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जातेय.

Follow Us
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा