चंद्राबाबूंना धक्का, टीडीपीच्या 60 नेत्यांसह हजारो कार्यकर्ते भाजपात

तेलंगणातील नेते भाजपात येणं हे आंध्रसाठीही चांगले संकेत आहेत, अशी प्रतिक्रिया टीडीपीतून काही दिवसांपूर्वी भाजपात आलेले लंका दिनकर यांनी दिली.

चंद्राबाबूंना धक्का, टीडीपीच्या 60 नेत्यांसह हजारो कार्यकर्ते भाजपात

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का बसलाय. त्यांच्या पक्षातील तेलंगणातील महत्त्वाचे 60 नेते (TPD leaders joins bjp) आणि हजारो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. या नेत्यांमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावरील अनेक मोठी नावं आहेत. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश (TPD leaders joins bjp) पार पडला. तेलंगणातील नेते भाजपात येणं हे आंध्रसाठीही चांगले संकेत आहेत, अशी प्रतिक्रिया टीडीपीतून काही दिवसांपूर्वी भाजपात आलेले लंका दिनकर यांनी दिली.

हजारोंच्या संख्येने जिल्हा स्तरावरील कार्यकर्ते भाजपात आले आहेत. जवळपास 20 हजार कार्यकर्त्यांनी टीडीपी सोडून भाजपात प्रवेश केला, अशी माहिती लंका दिनकर यांनी दिली. तिहेरी तलाक आणि कलम 370 च्या निर्णयानंतर भाजपची लोकप्रियता प्रचंड वाढली असून आणखी नेते भाजपात येण्यासाठी उत्सुक आहेत, असंही ते म्हणाले.

भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष 31 डिसेंबरपूर्वी निवडला जाईल, अशी माहितीही जेपी नड्डा यांनी दिली. भाजपात सप्टेंबरमध्ये 8 लाख बूथसाठी निवडणूक होईल, तर ऑक्टोबरमध्ये मंडळाच्या आणि नोव्हेंबरमध्ये जिल्हा स्तरीय निवडणुका होतील. 15 डिसेंबरपर्यंत सर्व राज्यात भाजपातील निवडणुका आटोपल्या जातील आणि त्यानंतर भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपने आंध्र प्रदेशात जम बसवण्यासाठी लक्ष केंद्रीत केलंय. यापूर्वी भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दक्षिण भारतात प्रचंड अपयश मिळालं होतं. त्यामुळे आता दक्षिण भारतावर लक्ष केंद्रीत करण्यात आलंय. यापूर्वी टीडीपीच्या चार राज्यसभा खासदारांनीही भाजपात प्रवेश केला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *