मुख्यमंत्र्‍यांच्या हेल्पलाईनवर तक्रार करणे युवकाला पडले भारी, कॅरेक्टर सर्टीफिकेटमध्ये लिहीली अशी गोष्ट की…

पोलिसांनी चक्क आपला हक्क मागणाऱ्या तरुणाला अशा प्रकारचे प्रमाणपत्र दिल्याने त्याच्यावर अन्याय झाला होता. त्याचे हे कॅरेक्टर सर्टीफिकेट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

मुख्यमंत्र्‍यांच्या हेल्पलाईनवर तक्रार करणे युवकाला पडले भारी, कॅरेक्टर सर्टीफिकेटमध्ये लिहीली अशी गोष्ट की...
| Updated on: Feb 15, 2025 | 4:08 PM

एका युवकाने नोकरीसाठी कॅरेक्टर सर्टीफीकेट्ससाठी पोलिसांकडे अर्ज केला होता. पोलिसांनी नेहमी प्रमाणे हे कॅरेक्टर सर्टीफिकेट्स वेळेत जारी केले नाही.यामुळे वैतागलेल्या या तरुणाने मुख्यमंत्री हेल्पलाईनला या संदर्भात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी जे केले ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, या तरुणाला कॅरेक्टर सर्टीफीकेट्स तर मिळाले परंतू त्यावर असा शेरा पोलिसांनी दिला की हे सर्टीफीकेट्स घेऊन त्याला काही उपयोग नव्हता, काय झाले नेमके पाहूयात…

एका युवकाला मुख्यमंत्र्‍यांच्या हेल्पलाईनवर तक्रार करणे भारी पडले आहे. त्याला कॅरेक्टर सर्टीफिकेट्सची गरज होती. म्हणून त्याने त्याच्या हद्दीतील पोलिस ठाण्यात कॅरेक्टर सर्टीफिकेट्सकरीता अर्ज केला. परंतू सर्टीफिकेट्स काही मिळत नव्हते. शेवटी वाट पाहून या तरुणाने मुख्यमंत्र्‍यांच्या हेल्पलाईनवर या पोलिस ठाण्याची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी कहरच केला. पोलिसांनी तरुणाला कॅरेक्टर सर्टीफिकेट्स दिले, तेव्हा तरुणाला आनंद झाला. त्यात सुरुवातीला लिहीले होते की या तरुणावर एकही गुन्हा दाखल नाही. परंतू जेव्हा त्याने हे प्रमाणपत्र नीट वाचले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण पोलिसांना असा शेरा दिला की तरुणाला वारंवार मुख्यमंत्री हेल्पलाईनला तक्रार करायची सवय आहे !

कॅरेक्टर सर्टीफिकेट्सने  खळबळ

हे प्रकरण मध्य प्रदेशातील असून  बैतुल जिल्ह्यात या कॅरेक्टर सर्टीफिकेट्सने  खळबळ उडाली आहे. नंतर या प्रकरणात मोठा ट्वीस्ट झाला. या संदर्भात तक्रार आल्यानंतर बैतूलचे एसपी निश्चल एन झारिया यांनी तात्काळ कारवाई करीत संबंधित पोलिस ठाण्याचे बलराम सरेयाम आणि विप्लव मरासे या दोघा निरीक्षकांना निलंबित केले आहे. अर्जदाराला वेळेत सर्टीफिकेट्स देणे हे पोलिसांचे काम होते, त्याबदल्यात त्याला असे प्रमाणपत्र देणे चुकीचे आहे. या तरुणाचे हे प्रमाणपत्र बदलून त्याला दुसरे कॅरेक्टर सर्टीफिकेट्स नव्याने जारी करण्यात आले आहे असे एसपी निश्चल एन झारिया यांनी सांगितले आहे.

बदलून दुसरे कॅरेक्टर सर्टीफिकेट्स दिले

पिडीत युवकाचे नाव रुपेश देशमुख असे आहे, तो भोपाळच्या व्होल्वो आयसर कंपनीच्या प्लांटमध्ये काम करतो. त्यासाठी त्याला कॅरेक्टर सर्टीफिकेट्स गरज होती. पोलिस त्याला कॅरेक्टर सर्टीफिकेट्स देत नव्हती. त्यामुळे त्याने हेल्पलाईनवर तक्रार केली होती, त्यानंतर त्याला अशा पद्धतीचे गैरलागू टिपण्णी केले प्रमाणपत्र देण्यात आले होते. या आधी रुपेशने केव्हाच हेल्पलाईनवर तक्रार केलेली नव्हती. आता एसपी झारीया यांनी संबंधित पोलिसांना खडसावल्याने त्यांना दुसरे कॅरेक्टर सर्टीफिकेट्स दिले आहे.